
Pune : पुण्यातील बहुप्रतिक्षित बाह्य रिंग रोडच्या पश्चिम कॉरिडोरवर कामाला गती मिळाली आहे. या 168. 605 किमी लांब मार्गाच्या कामाला सुरूवात होऊन सध्या एक वर्ष झालं आहे. या प्रकल्पासाठी 55,622 कोटी रुपये खर्च होणार आहे. पुणे बाह्य रिंग रोडचा मार्ग 110 मीटर रुंद असून यामुळे मुंबई ते बंगळुरू प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
कसे असतील मार्ग?
पुणे बाह्य रिंग रोड या मार्गावर एकूण आठ दुहेरी बोगदे, सात मार्ग, 10हून अधिक पूल, 26 भुयारी मार्ग, 21 ओव्हरपास आणि 9 पादचारी भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. या मार्गाचं काम सुरू झाल्याच्या एका वर्षानंतर पश्चिम कॉरिडोरवरील काम सुरू झालं आहे. यामुळे मुंबई, बंगळुरू आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासाचा वेळ वाचणार आहे. याशिवाय संपूर्ण मार्गावर अनेक अंडरपास आणि ओव्हरपाससुद्धा बांधण्यात येणार आहेत. यामुळे वाहतूककोंडी टाळणं शक्य होणार आहे. दरम्यान, संपूर्ण मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कुंपण घातले जाणार आहे. यामुळे मार्गावरील प्रवास सुरक्षित होणार आहे.
महराष्ट्रातील अनेक भागांत जाताना वाहनांना पुणे शहरातून प्रवास करावा लागतो. शहरात यामुळे सतत वाहतूक कोंडी वाढते तसेच बाहेर प्रवास करणाऱ्यांच्या वेळही वाढतो. या बाह्य रिंग रोडमुळे शहरात न जाताच थेट पुण्याहून इच्छुक स्थळी पोहचता येणार आहे. दरम्यान, शहरातील वाहनांना मोकळा श्वास घेता येणार असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून या प्रकल्पावर काम सुरू आहे.
पश्चिम व पूर्व कॉरिडोर
पुणे बाह्य रिंग रोडच्या प्रकल्पात सध्या दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात 65.45 किमी लांब पश्चिम कॉरिडोरचा समावेश असून दुसऱ्या टप्प्यात 103.155 किमी लांबीच्या पूर्व कॉरिडोरचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील काम 5 पॅकेजेसमध्ये करण्यात येणार असून पुढील टप्प्यातील काम 7 पॅकेडेसमदध्ये होणार आहे.
पश्चिम कॉरिडोर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उर्सेवरून ते थेट पुणे-बंगळुरू महामार्गावर शिवारेपर्यंत जोडला जाणार आहे. मुंबईहून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. पश्चिम कॉरिडोरच्या भुसंपादनाचं काम पूर्ण होणार असून बांधकामाला वेग आला आहे.
सध्या उर्से ते शिवारे पुणे बायपासवरून जावं लागतं. हा मार्ग 58 किमी लांब असला तरीही शहरातील वाहतूक कोंडीमुळे प्रवासाला 1 तास 20 मिनिटे लागतात. रिंग रोड तयार होताच हे अंतर 30 मिनिटांत पार होण्याची शक्यता आहे. सध्या 38 गावांमधून 99 टक्के जमीन MSRDCने संपादित केली आहे.
शहर
- चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना! धावत्या शाळकरी बसवर कोसळलं झाड; १० विद्यार्थी गंभीर जखमी, एक चिमुकला अडकल्याची भीती.
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- नागपुरात भीषण दुर्घटना! ७० वर्षे जुनी भिंत कारवर कोसळली; ५२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
महाराष्ट्र
- चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना! धावत्या शाळकरी बसवर कोसळलं झाड; १० विद्यार्थी गंभीर जखमी, एक चिमुकला अडकल्याची भीती.
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- नागपुरात भीषण दुर्घटना! ७० वर्षे जुनी भिंत कारवर कोसळली; ५२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू
- शहापूर सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी नरदेवरेड्डी पुल्लागोर, तर उपाध्यक्षपदी सूर्यकांत अन्नमवार यांची बिनविरोध निवड.
गुन्हा
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
- मध्य प्रदेश: आयपीएल स्टार शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस पिता कायदेशीर कचाट्यात! घरातील आचाऱ्याला मारहाण आणि वेठीस धरल्याप्रकरणी एफआयआर दाखल.
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- बिहारमध्ये संतापजनक घटना! मोमोजचे आमिष दाखवून मुलींना जाळ्यात ओढले; अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक.
- तुमची ट्रेन चुकली? काळजी नको, तिकीटाचे पैसे परत मिळवू शकता! जाणून घ्या काय आहेत नियम आणि प्रक्रिया.
- 'चंपत राय यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही'; राम मंदिर दान चोरी प्रकरणावर आचार्य धर्मदास महाराज आक्रमक!

























Subscribe to my channel


