काही दिवसांपूर्वी आपल्या मोबाइलवर रमजानच्या शुभेच्छांचे संदेश उमटू लागले. परंतु या सर्व आत्मीय शुभेच्छांच्या दरम्यान दोन अशा चित्रफितीदेखील होत्या, ज्यांना अल्गोरिदम खाली ढकलू शकला नाही. पहिली, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे एका समुदायाला या थराला जाऊन छळण्याचे आवाहन की, ते केवळ राज्यच नव्हे, तर देश सोडण्यास बाध्य होतील. दुसरी, 28 सेकंदांची एक चित्रफीत, ज्यात बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात धार्मिक पृथक्करणाचे आवाहन करतात. खरंच, आपण कोणत्याही प्रकारच्या घटनात्मक नैतिकतेपासून किती दूर भरकटलो आहोत! पाच राज्यांत निवडणुका होणार आहेत, तेव्हा राजकीय वक्तव्ये अधिक विखारी होत जातील. मुस्लिम समुदाय अनेकदा जातीय हल्ल्यांचे लक्ष्य राहिला आहे. परंतु आज मला या समुदायातील एका उप-समुदायावर - दाऊदी बोहरा शिया इस्माइली मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. भारतात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 20 कोटी आहे. यापैकी पाच लाख दाऊदी बोहरा आहेत. ‘बोहरा’ हा शब्द गुजराती शब्द ‘वोहरवू’ किंवा ‘व्यवहार’ यावरून आला आहे, ज्याचा अर्थ ‘व्यापार करणे’ असा होतो. बोहरा हा प्रामुख्याने व्यापारी समुदाय आहे. जगभरातील त्यांच्या सदस्यांचा साक्षरता दर जवळजवळ 100 टक्के आहे. संख्या कमी असूनही तो एक पुरोगामी समुदाय आहेत. त्यांचे दरडोई उत्पन्न इतर मुस्लिमांच्या तुलनेत अधिक आहे. भारतातील बोहरांपैकी सुमारे अर्धे लोक गुजरातेत राहतात. पंतप्रधान त्यांची गुजराती भाषा बोलतात. जेव्हा संसदेत वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले, तेव्हा त्याच्या काही दिवसांनंतरच पंतप्रधानांनी बोहरा समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला होता. या समुदायाच्या शिष्टमंडळाने वक्फ कायद्याची प्रशंसा केली होती. यातून असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला की भारतातील मुस्लिम या कायद्याचे समर्थन करतात. वास्तविक ही वस्तुस्थिती कुणापासून लपलेली नाही की वक्फ दुरुस्ती कायदा 2025 मुळात संघराज्य संरचना आणि अल्पसंख्याकांच्या हिताच्या विरोधात आहे. बिगर-रालोआ पक्षांच्या (ज्यामध्ये तृणमूल, काँग्रेस, एआयएमआयएम, सपा, द्रमुक, राजद यांचा समावेश आहे) मुस्लिम आणि बिगर-मुस्लिम खासदारांनी या विधेयकाला त्याच्या मूळ आधारावर आव्हान दिले आहे. येथे मनोरंजक बाब अशी आहे की, दाऊदी बोहरांच्या प्रतिनिधींनी 1923 मध्येच त्यांना मुसलमान वक्फ कायद्यातून वगळले जावे असे म्हटले होते. त्यांचा तर्क होता की बोहरा समुदाय अल-दाई अल-मुतलक यांच्यावर श्रद्धा ठेवतो, जे समुदायाच्या सर्व मालमत्तेचे एकमेव विश्वस्त आहेत. समुदायाला वाटते की त्यांच्या सदस्यांना स्वतःच्या मान्यतांनुसार मालमत्तेची स्थापना आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याची परवानगी दिली जावी. वक्फ दुरुस्ती कायद्याद्वारे प्रस्तावित वक्फ बोर्ड या स्वायत्ततेला आव्हान देते. अशा परिस्थितीत प्रश्न विचारला जाऊ शकतो की, ज्या विधेयकाला समुदायाचा ऐतिहासिक विरोध राहिला आहे, त्याचे समर्थन करण्यासाठी आणि पंतप्रधानांना भेटण्यासाठी शिष्टमंडळ का तयार झाले? देशातील अल्पसंख्याकांप्रति उघडपणे प्रदर्शित केल्या जाणाऱ्या कट्टरता, पक्षपात आणि पूर्वग्रहाच्या तुलनेत भाजपची ही रणनीती अधिक सूक्ष्म म्हणता येईल. गेल्या दशकातील घटनांचे बारकाईने निरीक्षण केले तर एक गोष्ट लक्षात येते की, भाजप शांतपणे अल्पसंख्याकांना एकमेकांविरुद्ध उभे करू इच्छितो. तो या गटांच्या अंतर्गत प्रकरणांमधील विसंगती ओळखतो आणि त्यामध्ये मदतीचा हात देतो, जेणेकरून व्यापक स्तरावर वादग्रस्त असलेल्या मुद्द्यांवर त्यांचे समर्थन मिळवता येईल. इंडोनेशिया आणि पाकिस्ताननंतर भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या राहते. 2011 च्या जनगणनेनुसार हा समुदाय देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 15% आहे. परंतु जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाकडे एकही असा मुस्लिम खासदार नाही, जो त्यांच्या चिन्हावर निवडून आला असेल. गुलाम अली राज्यसभेत ‘नामांकित’ श्रेणीतील 12 सदस्यांपैकी एक होते. सहा महिन्यांच्या आत त्यांनी सभापतींना पत्र लिहून स्वतःला भाजप सदस्य म्हणून समाविष्ट करून घेण्याची विनंती केली होती. परंतु उत्तर प्रदेशात सुमारे चार कोटी मुस्लिम आहेत, जे देशातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहेत, तरीही 403 सदस्यीय विधानसभेत भाजपचा एकही मुस्लिम आमदार नाही. ते शक्य तरी कसे होते! भाजपने कोणत्याही मुस्लिमाला उमेदवारीच दिली नव्हती. दुसरीकडे 8% हिंदू लोकसंख्या असलेल्या बांगलादेशकडे पाहा, ज्याने नुकताच हिंदू समुदायातून एक मंत्री निवडला आहे (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) गेल्या दशकातील घटना काय सांगतात?इंडोनेशिया आणि पाकिस्ताननंतर भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या आहे. परंतु जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाकडे एकही असा मुस्लिम खासदार नाही, जो त्यांच्या पक्ष चिन्हावर निवडून आला असेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


