नाशिक: जिल्ह्याील सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर लुटारूंच्या एका टोळक्याने मोठी दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मलढोण आणि दुशिंगपूर शिवारात (चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान) गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी पूर्वनियोजित सापळा रचत धावत्या वाहनांचे टायर पंक्चर केले आणि वाहनचालकांना व प्रवाशांना बेदम मारहाण करत लाखो रुपयांचा ऐवज लूटून नेला. या गंभीर घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुटुंबाला केले लक्ष्य आणि लुटला १८ लाखांचा ऐवज
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, श्रीकांत मिश्रा (वय ३८) हे आपल्या कुटुंबीयांसह मारुती सुझुकी कारने (क्रमांक एमएच २० जीके ०२०२) मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांच्या गाडीवर अचानक लोखंडी वस्तू आदळली आणि जोरदार आवाजात गाडीचे टायर फुटले. श्रीकांत मिश्रा यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत आपल्या गाडीचा वेग नियंत्रित केला आणि महामार्गावर गाडी थांबवली. गाडी थांबताच आधीपासूनच दबा धरून बसलेल्या १० ते १२ दरोडेखोरांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीला घेराव घातला.
लुटारूंनी वाहनातील लहान मुलांना बाहेर खेचण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. या अचनाक झालेल्या हल्ल्याने आणि दरोडेखोरांच्या उग्र रूपामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी जीवाच्या बाजी लावून अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि रोख ८४ हजार ५०० रुपये असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटारूंच्या स्वाधीन केला. दरोडेखोरांनी या दरम्यान प्रवाशांना मारहाणही केली.
इतर वाहनांनाही बनवले टार्गेट
याच टोळीने महामार्गावरील आणखी काही वाहनांना अशाच पद्धतीने लक्ष्य केल्याचे तपासात समोर आले आहे. एका हिंगोलीहून जाणाऱ्या वाहनावर दगडफेक करत लुटारूंनी असाच लुटीचा प्रयत्न केला. एका वाहनचालकाने आपली गाडी न थांबवता प्रसंगावधान राखून गाडीचा वेग वाढवल्याने तो थोडक्यात बचावला.
याशिवाय, मध्यरात्री १:४० वाजण्याच्या सुमारास मुंबईहून प्रवास करणाऱ्या नांदेडच्या एका व्यापाऱ्याच्या वाहनाचे टायरही धारदार वस्तू टाकून फोडण्यात आले. कार थांबताच काही दरोडेखोर चालकाला मारहाण करण्यासाठी धावले. मात्र, संकटाची जाणीव झाल्याने आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या व्यापाऱ्याने त्याच्याजवळील परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन राऊंड फायर केले. गोळीबाराचा तीव्र आवाज ऐकताच दरोडेखोरांनी घाबरून महामार्गावरून खाली उड्या मारल्या आणि अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला.
पोलिसांची तात्काळ धाव आणि तपास सुरू
या गंभीर घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, 'डायल ११२' पथक, 'क्यूआरव्ही' आणि वावी पोलीस ठाण्यातील अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात दरोडा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक आशीष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी होणाऱ्या अशा गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी गस्ती पथके अधिक तीव्र करण्याची मागणी संतप्त नागरिकांमधून केली जात आहे.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!























Subscribe to my channel



