कोल्हापूर: इचलकरंजी जवळील कबनूर-रुई हद्दीच्या परिसरात एक अत्यंत थरारक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियासाठी व्हिडिओ किंवा रील बनवण्याच्या नादात किंवा गोळीबाराच्या दुर्घटनेत एका १९ वर्षीय तरुणाच्या डोक्यात बंदुकीची गोळी घुसल्याची गंभीर घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार लपवण्यासाठी तो तरुण दुचाकीवरून पडून जखमी झाल्याचा बनाव त्याच्यासोबत असलेल्यांकडून करण्यात आला होता, मात्र डॉक्टरांनी केलेल्या सीटी स्कॅन (CT Scan) तपासणीमुळे हा सर्व काळाबाजार उजेडात आला.
नेमकी घटना कशी घडली? पोलिसांनी व सूत्र मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश शशिकांत कांबळे (वय १९, रा. महात्मा फुलेनगर, कबनूर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कबनूर-रुई परिसरात घडलेल्या या प्रकरणात नीलेश याच्या कानामागून डोक्यात बंदुकीची गोळी शिरल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला ही माहिती लपवण्यासाठी तो तरुण दुचाकीवरून पडून जखमी झाल्याचे सांगत त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सीटी स्कॅन रिपोर्टमुळे बिंग फुटले: जखमी तरुणाला रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांना त्याच्या डोक्यातील व शरीराची दुखापत शंकास्पद वाटली. वैद्यकीय उपचाराचा भाग म्हणून जेव्हा त्याचे सीटी स्कॅन (CT Scan) करण्यात आले, तेव्हा डॉक्टरांना आणि उपस्थितांना मोठा धक्काच बसला. दुचाकीवरून पडल्याची खात्री सांगणाऱ्या तरुणाच्या डोक्यात खरोखरच बंदुकीची गोळी घुसल्याचे स्कॅन रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच रुग्णालयात आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांची कारवाई आणि संशयितास ताब्यात घेतले: या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शुभम दीपक सूर्यवंशी या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रील बनवताना किंवा हवेत गोळीबार करताना हा प्रकार घडला की यामागे इतर काही कारण आहे, याबाबत पोलीस कसून चौकशी करत असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी चर्चा व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
- मुंबई: फक्त दक्षिण मुंबई स्वच्छ दिसली म्हणजे संपूर्ण शहर स्वच्छ नाही; कचरा आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे बीएमसीला खडेबोल!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
- सोलापूर: राहुल-प्रियांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसची आक्रमक निदर्शने; कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट, कपडेही फाटले!























Subscribe to my channel



