अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच अनधिकृत विक्रीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेंतर्गत राज्यभरात तब्बल २.२३ कोटी रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, २३ अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच या कारवाईदरम्यान ७ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील खाऊ गल्ली आणि विविध भागांतील कारवाई:
पुण्यातील प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांवर व अन्न आस्थापनांवर एफडीएच्या पथकांनी कडक पावले उचलली आहेत. जंगली महाराज रस्ता (जेएम रोड) खाऊ गल्ली परिसरातील तपासणीदरम्यान ८ विनानोंदणीकृत विक्रेत्यांचा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांच्यावर २.४० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच पुण्यातील कारवाईत १० परवाने निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय ठाणे, रायगड आणि पुण्यात चहा मिक्स, तूप, जेलीपॉप यांसारखा ६८,०९४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
भिवंडीतील फेरछपाईचा प्रकार, पंढरपूर वारी तपासणी आणि प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई:
राज्यभरातील मोहिमेत भिवंडीतील अन्नपदार्थांवरील मुदत दिनांक (Expiry Date) व एमआरपी (MRP) थिनरने खोडून त्यावर फेरछपाई करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात ५४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, दोषी आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. मुंबईत ६, तर नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातही परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोकण व नाशिक विभागात ६ आस्थापनांचे परवाने निलंबित झाले आहेत. दरम्यान, प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याविरोधात राबविलेल्या मोहिमेत १६.४२ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा साठा जप्त करून ४ एफआयआर (FIR) दाखल करण्यात आल्या असून ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
शहर
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
महाराष्ट्र
- पुणे: ई-बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील दीड लाख रिक्षाचालकांचे २३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन; राज्यातही संपाची हाक
- कोल्हापूर: महिन्याला २६ कोटींहून अधिक उलाढालीची झेप! गोकुळच्या दूध दरवाढीच्या निर्णयावेळी चार अशासकीय सदस्य अनुपस्थित
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा


























Subscribe to my channel




