वडगावमधील आरएमसी प्लांटमुळे १० हजार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ: प्रशासनाची नरम भूमिका आणि काँग्रेसचा सवाल, कारवाई का होत नाही

पुणे शहरातील वडगाव खुर्द आणि धायरी परिसरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांटमुळे निर्माण झालेल्या गंभीर प्रदूषणामुळे परिसरातील तब्बल १० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पुणे महापालिका प्रशासनाकडून शहरातील इतर भागांत अनधिकृत आरएमसी प्लांटवर कारवाई केली जात असताना, वडगाव आणि धायरी परिसरातील प्लांटवर राजकीय दबावामुळे कारवाई टाळली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने व स्थानिकांनी केला आहे. या दुजाभवावर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रदूशणाचा विळखा आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात:पुणे महापालिका हद्दीत शंभरहून अधिक अनधिकृत आरएमसी प्लांट सुरू असून, त्यापैकी वडगाव आणि धायरी परिसरातील नदीकाठच्या व रहिवासी क्षेत्रातील प्लांट दिवस-रात्र अवाजवी धूळ आणि प्रदूषण पसरवत आहेत. या उडणाऱ्या सिमेंटच्या धुळीमुळे आणि प्रदूषणामुळे लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार जडले आहेत. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची ही बिकट परिस्थिती असतानाही महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या गंभीर बाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

राजकीय दबाव आणि कारवाईत जाणीवपूर्वक टाळाटाळ:बावधन आणि इतर परिसरांमध्ये महापालिकेने अनधिकृत आरएमसी प्लांटवर हातोडा चालवून धडक कारवाई केली, मात्र वडगाव खुर्द व धायरी परिसरातील प्लांटवर कारवाईची वेळ येते, तेव्हा ऐनवेळी पोलिस बंदोबस्त मागवूनही वरिष्ठांच्या किंवा राजकीय नेत्यांच्या दबावामुळे ही कारवाई रद्द केली जाते. स्थानिक सत्ताधारी पक्षाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींचे किंवा नेत्यांचे हे प्लांट असल्यामुळेच प्रशासनाकडून त्यांना अभय दिले जात असल्याचा थेट सवाल काँग्रेस पक्षासह स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांचा एल्गार आणि आंदोलनाचा पवित्रा:प्रशासनाच्या या दुजाभाव आणि दिरंगाईच्या धोरणामुळे संतप्त झालेल्या परिसरातील १० हजारांहून अधिक नागरिकांनी एकत्र येत प्रयेजा सिटी व विविध सोसायट्यांच्या माध्यमातून एक 'कृती समिती' स्थापन केली आहे. जर लवकरात लवकर या अनधिकृत आरएमसी प्लांटवर कठोर कायदेशीर कारवाई करून ते सील केले नाहीत, तर तीव्र स्वरूपाचे 'रास्ता रोको' आंदोलन पुकारण्यात येईल आणि याप्रकरणी थेट राष्ट्रीय हरित लवादाकड (NGT) दाद मागितली जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *