छत्रपती संभाजीनगर: शहरातील खवय्यांसाठी अत्यंत आवडते आणि विशेषतः चवदार इमरती, जिलेबी व समोशांसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमंडी परिसरातील मछलीखडक येथील ऐतिहासिक 'उत्तम उपहारगृह'वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. या उपहारगृहात अत्यंत अस्वच्छ वातावरणात उघड्यावर अन्नपदार्थ बनवणे आणि आरोग्याला घातक अशा पुनर्वापर केलेल्या तेलाचा सर्रास वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत एफडीएच्या पथकाने या प्रसिद्ध उपहारगृहाचा परवाना तडकाफडकी निलंबित करून दुकान तात्काळ सील केले आहे.
टीपीसी मीटरने उघड केली पोलखोल; २५ ऐवजी तब्बल ५८ आले तेलाचे रीडिंग
उहारगृहातील विविध अनियमिततेबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एफडीएचे सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी कि. ल. झाडे व त्यांच्या पथकाने बुधवारी या उपहारगृहावर अचानक छापा टाकला. या तपासणीदरम्यान तेथे अन्नपदार्थांच्या उत्पादकाऐवजी थेट उपहारगृहाच्या नावाखाली चुकीचा परवाना काढल्याचे निष्पन्न झाले. समोसे आणि भज्यांसाठी वारंवार उकळलेल्या सरकी तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केला जात होता. एफडीएने 'टीपीसी' (Total Polar Compounds) मीटरने या तेलाची कसून तपासणी केली असता, जे रीडिंग नियमांनुसार २५ च्या आत असणे बंधनकारक असते, ते थेट ५८ एवढे अत्यंत भयानक आणि आरोग्यासाठी घातक असल्याचे आढळले. तसेच इमरती आणि जिलेबीसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती तेलाचे रीडिंग देखील ३६ इतके उच्च पातळीवर आढळले.
सांडपाण्याजवळ इडलीचे पीठ अन् भिंतींवर तंबाखूच्या थुंक्या
एफडीएच्या पथकाने जेव्हा प्रत्यक्ष स्वयंपाकघराची पाहणी केली, तेव्हा तेथील दृश्य अत्यंत संतापजनक होते. अन्नपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी सर्रास झुरळांचा मोठा वावर होता. विशेष म्हणजे, इडलीसाठी आंबवून ठेवलेले पीठ सांडपाण्याच्या अत्यंत जवळ आणि पूर्णपणे उघड्यावर ठेवलेले आढळले. अन्नपदार्थ झाकण्यासाठी असलेल्या कचराकुंड्यांना योग्य झाकणे नव्हती आणि स्वयंपाकघरातील खिडक्यांना जाळ्याही बसवलेल्या नव्हत्या. इतकेच नव्हे तर समोसे आणि भजे बनवण्याच्या अगदी जवळच्या भागात कामगारांच्या तंबाखू व चुन्याच्या डब्या ठेवलेल्या स्पष्ट दिसून आल्या, तर स्वयंपाकघरातील भिंतींवर तंबाखू खाऊन थुंकलेले डाग स्पष्ट दिसत होते.
घातक खाद्यरंगांचा अमर्याद वापर आणि वैद्यकीय चाचण्यांचा अभाव
तपासात असेही पुढे आले की, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तयार होणाऱ्या इमरती व मिठाईमध्ये आरोग्याला अत्यंत धोकादायक असणाऱ्या रासायनिक खाद्यरंगांचा अमर्याद व नियमबाह्य वापर केला जात होता. हे रासायनिक रंग नेमक्या किती प्रमाणात वापरावेत, याचे साधे तांत्रिक ज्ञानही तेथील कामगारांना नव्हते. तसेच, तिथे काम करणाऱ्या कोणत्याही कामगाराची अनिवार्य अशी कोणतीही वैद्यकीय आरोग्य तपासणी (Medical Test) केलेली नव्हती. एफडीएच्या पथकाने निकृष्ट दर्जाचे व पुनर्वापर होत असलेल्या खाद्यतेलाचे व इतर साहित्याचे नमुने जप्त करून तात्काळ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रसिद्ध हॉटेलवर प्रशासनाने कठोर पावले उचलल्यामुळे शहरातील इतर खाद्य व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



