जून 2019 मध्ये तो कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट म्हणून रुजू झाला. कॉलेजमधून बाहेर पडताच तो थेट येथे जॉइन झाला. अनेक मुले असलेल्या कुटुंबांना माहीत असलेली ही कंपनी आहे. विक्रीचे काम सोपे होते. बॅकएंड टीम त्याला कुठे भेट द्यायची हे सांगत असे. कंपनीचे ॲप असलेले लोक किंवा कधीतरी ॲप वापरणाऱ्यांना कोर्स विकण्याचे त्याला काम होते. हे संभाषण आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल असल्याने पालक लक्षपूर्वक ऐकत असत. ते त्याला पाणी, ज्यूस आणि स्नॅक्स देखील देत असत. तो त्यांच्या घरी बसायचा. खात असे, पीत असे आणि मुलाला परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत करण्यासाठी संपूर्ण कोर्स मटेरियलने भरलेला टॅब्लेट विकायचा. टॅब्लेट देण्यापूर्वी तो थोडे पैसे घेत असे आणि पालकांना एक करार करायला लावत असे. त्यात कर्ज देणाऱ्या कंपनीला मासिक हप्ते देण्यास पालक सहमत होत. दररोज सकाळी तो ‘टार्गेट्स’ आणि ‘रूपांतरण दर’ या भाषेत स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे. ते खूप छान वाटले. कारण लोक त्याला सेल्समन म्हणून नव्हे तर “रक्षक’ म्हणून पाहत होते -आपल्या मुलांना गरिबीपासून वाचवण्याची गुरुकिल्ली हाती असलेला हा माणूस म्हणून पालक त्याच्याकडे पाहायचे. हे पालक कारखान्यांमध्ये आणि छोट्या दुकानांमध्ये ओव्हरटाइम काम करत होते. एके दिवशी तो एका वडिलांच्या डोळ्यात पाहत होता. तो 8,000 रुपयांचे “डाउन पेमेंट’ करण्यासाठी त्याला किती जेवण वगळावे लागेल याचा हिशेब करत होता. त्याला असे वाटले की तो एका असाहाय्य वडिलांकडे पाहत आहे. त्याला वेदना होत होत्या, परंतु तरीही त्याने त्याला त्या रकमेच्या दहापट कर्ज करार दिला. पहिल्यांदाच त्याला जाणवले की तो काहीही विकत नाही तर हळूहळू लूट करत आहे. त्याला वाटले की तो खोट्या आश्वासनांवर आधारित करिअर घडवत आहे. त्याच्या वरिष्ठांनी “क्रशिंग द नंबर्स’चा आनंद साजरा केला, परंतु प्रत्येक विक्री त्याच्या विवेकावर एक जखम करत होती. कुणाच्या तरी अपेक्षांना वस्तू बनवण्याच्या खेळात आपण ओढले जाऊ नये, असे त्याला वाटत होते. इतर तरुणांप्रमाणे तो लग्न आणि मुलांचे स्वप्न पाहत होता, पण त्याच्या स्वप्नात तो त्याचे मूल कंपनीसाठी फक्त एक लीड व वडील म्हणून तो स्वतः ला एक “पाकीट’ बनत असल्याचे पाहत होता. त्या दिवशी त्याला कळले की, त्याने काही हजार रुपये आणि बिझनेस कार्ड टायटलसाठी त्याच्या प्रामाणिकपणाची देवाणघेवाण केली आहे. सहा आठवड्यांनंतर जुलैच्या मध्यात त्याला जाणवले की, “उदरनिर्वाह करणे’ आणि “जीवन लुटणे’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या वडिलांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याने ताबडतोब राजीनामा दिला. तो काम करू शकत नव्हता म्हणून नाही तर तो व्यक्ती बनत होता. त्याच्यासोबत राहू शकत नव्हता म्हणून. तो आजही सेल्समध्ये आहे आणि लोकांना प्रत्यक्षात गरजेच्या गोष्टी विकतो. म्हणून तो बरेच चांगले काम करतो. त्याने त्याच्या रिझ्युममधून तो अनुभवही काढून टाकला. त्या सहा आठवड्यांच्या कारकीर्दीबद्दल कोणालाही माहिती नाही. तो लोकांना सांगतो, “पदवीधर झाल्यानंतर मी तीन महिने बेरोजगार होतो. नंतर मला नोकरी मिळाली, पण ती त्याची सर्वात काळी बाजू होती, याची त्याला जाणीव होती. आज मी ही गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे कॅम्पस भरती मोठ्या प्रमाणात होत आहे. कंपन्या विद्यापीठांमधून उच्च प्रतिभेची भरती करत आहेत. उच्च पगाराची नोकरी शोधण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, परंतु मी तुम्हाला एक उत्कृष्ट कंपनी निवडण्याचा आग्रह करतो - नीतिमत्ता असलेली. जेणेकरून तुम्हाला या कर्मचाऱ्याने अनुभवलेल्या वेदना सहन कराव्या लागणार नाहीत. फंडा असा की, कोणताही करिअर टप्पा अंतरात्म्याची बरोबरी करू शकत नाही. कोणताही पगार एखाद्याची स्वप्ने हिरावून घेण्याच्या अपराधीपणाची भरपाई करू शकत नाही. म्हणूनच या गोष्टीला कठीण होऊ देऊ नका.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




