
Lonavala : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याच्या प्रवेशद्वारावर ३ फेब्रुवारीला प्रोपलीन या ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या अपघातानंतर उद्भवलेल्या अभूतपूर्व वाहतूक, त्यामुळे झालेल्या समस्यांचे परिणाम, पडसाद अजूनही ताजे असताना आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पुन्हा एकदा टँकरला अपघात झाला आहे. अमृत अंजन पुलाजवळील तीव्र उतार व वळणावर पुन्हा एकदा प्रोपलीन या ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकरला अपघात झाला. मात्र हा टँकर मार्गालगत असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गटारात जाऊन अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. जर टँकर उलटला असता तर, पुन्हा २० दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती झाली असती.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी कोचीहून गुजरातला प्रोपलीन या ज्वलनशील गॅस घेऊन जाणाऱ्या टँकर (क्रमांक- एनएल-०१/एएफ-५०४०) चालकाचे खंडाळा घाटातील अमृत अंजन पुलाजवळील तीव्र उतार व वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर मार्गालगत असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले सिमेंटचे दुभाजक तोडून मार्गालगतच्या गटारात जाऊन अडकला अन् मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळापासून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील, निलेश सरोदे, खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे, रसायनतज्ज्ञ धनंजय गीध यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली आणि युद्धपातळीवर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्याची मोहीम सुरू केली. अर्धा तासात अपघातग्रस्त गॅस टँकर क्रेनच्या सहाय्याने सुरक्षितपणे हटवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला.
अपघातग्रस्त गॅस टँकर हटवल्यानंतर काही वेळाने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. या घटनेचे वृत्त समजताच सर्वत्र पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. २० दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताच्या घटना पुन्हा ताज्या झाल्या होत्या. त्यावेळच्या परिस्थितीचे चित्र सर्व प्रशासन, यंत्रणा आणि प्रवाशांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. अपघात किरकोळ असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ३ फेब्रुवारीला प्रोपलीन गॅसची वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आणि जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अभूतपूर्व अशी ३८ तास वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातानंतर उद्भवलेल्या अभूतपूर्व वाहतूक, त्यामुळे झालेल्या समस्यांचे परीणाम, पडसाद पुन्हा उमटू लागले होते. मात्र सुदैवाने मागच्या गॅस टँकरप्रमाणे हा गॅस टँकर मार्गावर उलटला नाही. अन्यथा पुन्हा एकदा ३ फेब्रुवारीला झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती झाली असती.
शहर
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: तेरवाडमध्ये भरधाव कंटेनरचा थैमान; पादचारी महिला व दुचाकीस्वारांना चिरडल्याने चारजण जागीच ठार, चालक पसार
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!























Subscribe to my channel



