पुणेः घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदा पद्धतीने गॅस काढून तो रिकाम्या सिलेंडरमध्ये भरून विक्री करण्याचा प्रकार मुंढवा परिसरात उघडकीस आला आहे. कोणतीही परवानगी न घेता सुरू असलेल्या या धोकादायक रिफिलिंग प्रकरणी मुंढवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. भूपेंद्रप्रताप सुंदर सिंह (वय ३८, रा. साईनगर, मुंढवा नगरी), मानकराम सुखराम सियाक (वय ३९, रा. सोमनाथ मळा, पठारे वस्ती, चंदननगर) आणि महेंद्र बाबूराम खिचड (वय १९, रा. खराडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा गावातील शिवसेना कार्यालयाजवळ हा प्रकार सुरू होता. आर्थिक लाभाच्या उद्देशाने आरोपींनी गॅस सिलेंडरची अवैध रिफिलिंग करण्याची व्यवस्था केली होती. भरलेल्या सिलेंडरमधून पाइपच्या साहाय्याने गॅस काढून तो रिकाम्या सिलेंडरमध्ये भरला जात होता. त्यानंतर हा गॅस कोणतीही अधिकृत परवानगी नसताना विकला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
दि. ७ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर केलेल्या तपासणीत आरोपी गॅस सिलेंडरची रिफिलिंग करताना आढळून आले. या प्रक्रियेदरम्यान आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन केले जात नव्हते. त्यामुळे गॅसगळती झाल्यास आग लागण्याबरोबरच स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला होता. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेलाही त्यामुळे धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिस कर्मचारी एकता बाबूराव साळुंके यांच्या फिर्यादीवरून मुंढवा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, २८७ तसेच आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम ३ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक पुढील तपास करत आहेत.
अवैध रिफिलिंगवर लक्ष...
अवैध पद्धतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी शहरातील इतर भागांतही पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अशा प्रकारे गॅसची रिफिलिंग किंवा विक्री होत असल्याचे आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच गॅस वितरकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना देण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी सांगितले.
शहर
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
- नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव; सिंहस्थाच्या विकासकामांवर नागरिकांचा तीव्र संताप!
- पुणे: रखडलेला रस्ते विकास आणि विस्कळीत पाणीपुरवठा: प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका
महाराष्ट्र
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
- नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव; सिंहस्थाच्या विकासकामांवर नागरिकांचा तीव्र संताप!
- पुणे: रखडलेला रस्ते विकास आणि विस्कळीत पाणीपुरवठा: प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!






















Subscribe to my channel



