मुंबई: मुलुंड पूर्व येथील नवघर रोड परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पग्रस्तांसाठी (PAP) सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाजवळ उभारण्यात आलेल्या एका लेबर कॅम्पला गुरुवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत कॅम्पमध्ये ठेवण्यात आलेल्या ५ किलोचे ७ आणि १४.२ किलोचा १ असे एकूण आठ घरगुती गॅस सिलिंडर एकापाठोपाठ एक स्फोट होऊन फुटले. या लागोपाठ झालेल्या स्फोटांमुळे संपूर्ण परिसरात एकच दहशत पसरली होती आणि आगीच्या भीषण ज्वाला व धुराचे लोट दूरवर दिसत होते. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, कॅम्पमध्ये काम करणारे ३०० हून अधिक कामगार वेळीच सुरक्षित ठिकाणी बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुलुंड पूर्वेला मुंबई महापालिकेच्या वतीने प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन इमारती उभारण्याचे मोठे काम सुरू आहे. या प्रकल्पाची जबाबदारी शापूरजी पालोनजी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे असून, कामाच्या ठिकाणाजवळच कामगारांच्या राहण्यासाठी हा लेबर कॅम्प उभारण्यात आला होता. गुरुवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास या लेबर कॅम्पला अचानक आग लागली. पाहता पाहता आग एवढी भडकली की तिने संपूर्ण कॅम्पला आपल्या तडाख्यात घेतले. कॅम्पच्या उभारणीसाठी प्रामुख्याने मेटल शीट (पत्रे), लाकूड आणि इतर ज्वलनशील साहित्याचा वापर करण्यात आल्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली.
आग लागल्याचे लक्षात येताच प्रकल्पाच्या आसपास काम करणाऱ्या कामगारांनी आणि लेबर कॅम्पमधील मजुरांनी तातडीने पळ काढून आपला जीव वाचवला. काही क्षणांतच कॅम्पमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा भीषण भडका उडाला. यात पाच किलोचे सात आणि चौदा किलोचा एक असे आठ सिलिंडर लागोपाठ फुटल्याने झालेला स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दूरवर ऐकू गेला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. या स्फोटांमुळे परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल आठ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. परिमंडळ सहाचे सहायक विभागीय अग्निशमन केंद्र अधिकारी डी. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले. सुमारे दोन तासांच्या सरावळलेल्या प्रयत्नांनंतर जवानांना या भीषण आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. कॅम्पमध्ये कामगारांचे राहण्याचे साहित्य, कपडे आणि इतर सामान जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे अद्याप नेमके कारण समजू शकले नाही. स्थानिकांच्या मते, कॅम्पच्या एका कोपऱ्यात कपड्यांना किंवा अन्य साहित्याला आग लागून ती संपूर्ण भागात पसरली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या सखोल तपासणीनंतरच आगीचे मूळ कारण स्पष्ट होईल. मुंबईतील मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या दुर्घटनेमुळे ऐरणीवर आला असून, प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदारांनी सुरक्षेच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
शहर
- मुंबई: आदिवासी आणि रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा; बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेची आक्रमक मागणी
- मुंबई: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी मध्य रेल्वे उभारणार पाच केंद्रे; वाडीबंदर, एलटीटी, पनवेल, कल्याण, इगतपुरीत प्रकल्प
- पुणे: कुंडमळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू
- पुणे: धायरीत आरएमसी प्लांटवर कारवाईचा दिखावा..! फक्त पत्र्यांची शेड पाडली, मुख्य यंत्रणेला हात नाहीच
महाराष्ट्र
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- कोल्हापुर: ऊस दराची कोंडी फुटणार? कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक
- मुंबई: आदिवासी आणि रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा; बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेची आक्रमक मागणी
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!



























Subscribe to my channel




