मुंबई: कल्याण मध्ये अविवाहित शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश संपवलं; मृत्यूचं मोठं गूढ उकललं!

मुंबई: ठाणे जिल्ह्यात हत्येचे सत्र थांबलेले नसून, एका शिक्षिकेची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने तिच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने सह्या घेऊन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कल्याणमधील एका बेपत्ता झालेल्या शिक्षिकेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात कल्याण गुन्हे शाखेला यश आले आहे. मृत महिलेला आरोपींनी विमा पॉलिसी घेण्याच्या बहाण्याने आसनगाव येथे बोलावले होते. नंतर तिला दिगंबर आव्हाड याच्या आसनगाव येथील भाड्याच्या घरात नेण्यात आले. तिथे तिच्याकडून जबरदस्तीने मृत्यूपत्रावर आणि कागदपत्रांवर सह्या करून घेतल्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

 

या प्रकरणी मृतदेह सिन्नर-घोटी मार्गालगत फेकून देण्यात आला होता. भावाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखेकडून करण्यात येत असताना ही थरारक माहिती उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *