पुणे: मोहम्मदवाडी येथील एनआयबीएम ॲनेक्स परिसरातील सात हजारांहून अधिक कुटुंबांनी परिसरातील मोकळ्या जागेवर सार्वजनिक उद्यान आणि चालण्यासाठी मार्ग, व्यायाम व जॉगिंग करता यावे, यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यात यावी, अशी मागणी पुणे महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
एनआयबीएम ॲनेक्स परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभी राहिली आहेत. मात्र, या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक उद्याने, खेळाची मैदाने आणि नागरिकांसाठी खुल्या जागा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.परिसरातील एलिना लिव्हिंग सोसायटी, रहेजा स्टर्लिंग, मॅपल टॉवर, ओरिएंट हिल व्ह्यू यांसह विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी पुणे महापालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन एलिना लिव्हिंग सोसायटीसमोरील मोकळ्या जागेचा सार्वजनिक उपयोगासाठी विकास करण्याची मागणी केली होती.
संबंधित जागा पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी राखीव असल्याचे रहिवाशांनी नमूद केले आहे. मात्र, सध्या जागेचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन तिचा सार्वजनिक उपयोगासाठी विकास करण्यात यावा, अशी मागणी आहे.
उद्यान, चालण्याचा मार्ग, जॉगिंग ट्रॅक आणि आवश्यक मूलभूत सुविधा उभारल्यास परिसरातील सात हजारांहून अधिक कुटुंबांना त्याचा थेट फायदा होईल. त्याचबरोबर मोकळ्या जागेवरील कचरा आणि अस्वच्छतेची समस्याही दूर होण्यास मदत होईल, असा रहिवाशांचा दावा आहे.
एनआयबीएम ॲनेक्स परिसरातील नागरिकांनी आता महापालिका प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून उपलब्ध जागेचा विकास आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सार्वजनिक उद्यान आणि चालण्याचा मार्ग उपलब्ध झाल्यास नागरिकांच्या आरोग्यासोबतच परिसरातील पर्यावरण आणि सुरक्षिततेतही सुधारणा होईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
शहर
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
- नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव; सिंहस्थाच्या विकासकामांवर नागरिकांचा तीव्र संताप!
- पुणे: रखडलेला रस्ते विकास आणि विस्कळीत पाणीपुरवठा: प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका
महाराष्ट्र
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
- नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव; सिंहस्थाच्या विकासकामांवर नागरिकांचा तीव्र संताप!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!























Subscribe to my channel



