'दुनियादारी' दिग्दर्शक संजय जाधव यांचा मोठा खुलासा; चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ऑफिस कसं रिकामं झालं, याचा सांगितला रंजक किस्सामराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या कारकिर्दीतील एका अत्यंत कठीण आणि कटू आठवणीचा खुलासा केला आहे.
२०१३ मध्ये आलेल्या 'दुनियादारी' (Duniyadari) या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आपल्यात कसा अहंकार (माज) आला होता आणि त्यानंतर आलेल्या 'प्यारवाली लव्हस्टोरी' (Pyaar Vali Love Story) या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाने आपल्याला जमिनीवर कसे आणले, याबद्दल त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे भाष्य केले आहे. "दुनियादारी हिट झाली आणि मी हवेत गेलो"संजय जाधव यांनी सांगितले की, 'दुनियादारी' या चित्रपटाने मराठी बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते.
या अफाट यशानंतर मी प्रचंड धुंदीत आणि हवेत होतो. मला असे वाटू लागले होते की, आता मला पुढे किंवा मागे वळून बघायची गरजच नाहीये, आता माझ्याकडे फक्त कामच काम असणार.
हा यशाचा काळ किमान १० वर्षे तरी असाच टिकून राहील, असा गैरसमज माझ्या मनात निर्माण झाला होता. त्या काळात माझ्या ऑफिसमध्ये दररोज २४ ते २५ जण केवळ माझ्यासोबत काम मिळवण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी जेवायला असायचे. कित्येक जण 'इथून चाललो होतो म्हणून चहा प्यायला आलो' असे म्हणून ऑफिसमध्ये गर्दी करायचे.
'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाली अन् धक्का बसला:याच धुंदीत संजय जाधव यांनी स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांना घेऊन 'प्यारवाली लव्हस्टोरी' हा चित्रपट बनवला. हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला होता.
चित्रपट रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मॅनेजरने त्यांना फोन करून सांगितले की, "सर, थिएटरमध्ये प्रेक्षकांची संख्या खूप कमी आहे आणि कमाईमध्ये मोठा ड्रॉप (घसरण) झाला आहे.
"सुरुवातीला संजय जाधव यांना वाटले की, एखादा दिवस असा असू शकतो, शनिवार-रविवार चित्रपट नक्कीच चांगली कमाई करेल. मात्र, शनिवार आणि रविवारही चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला.अख्खं ऑफिस एका रात्रीत रिकामं झालं:चित्रपट फ्लॉप झाल्याचा धक्का तर मोठा होताच, पण त्याहूनही मोठा धक्का संजय जाधव यांना लोकांच्या बदललेल्या वर्तनामुळे बसला. त्यांनी सांगितले की, जो चित्रपट फ्लॉप झाला, त्याच्या पुढच्याच दिवसापासून त्यांच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या २५ लोकांची गर्दी गायब झाली.
"अख्खं ऑफिस एका रात्रीत रिकामं झालं होतं. कालपर्यंत जे लोक कौतुक करत होते, ते अचानक दिसेनासे झाले. या अपयशाने आणि रिकाम्या झालेल्या ऑफिसने मला सर्वात मोठा धडा शिकवला की, इंडस्ट्रीमध्ये उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. यशाच्या हवेत कधीही वाहून जाऊ नये," अशी भावुक आणि कटू आठवण संजय जाधव यांनी व्यक्त केली.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




