मनोज जरांगे-पाटील यांनी काल 500 कोटी रुपयांचा कोणताही थेट आरोप केलेला नव्हता. एकनाथ शिंदे यांनी पैसे घेतले नाहीत आणि दिलेही नाहीत, हे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे तो विषय तिथेच संपला आहे. मात्र, मनोज जरांगे-पाटील यांनी जी ऑडिओ क्लिप ऐकवली, त्यात चार लोक विविध विषयांवर चर्चा करताना ऐकू येत आहेत. ती क्लिप खरी आहे का? त्यात बोलणारे व्यक्ती कोण आहेत? त्यांना ही सुपारी कोणी दिली? आणि यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे? हे सर्व सत्य बाहेर येण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, मी जरांगे-पाटील यांना विनंती करतो की, जर त्यांच्याकडे बदनामी करणाऱ्यांची नावे असतील तर ती त्यांनी जाहीर केली पाहिजेत. त्यामुळे अशी बदनामी करणाऱ्यांच्या मनात आपण उघडे पडू, अशी भीती निर्माण होईल. रोज एकमेकांचे डोके फोडणे आणि परस्परांविरोधात बोलणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. राजकारण एका बाजूला ठेवा, पण जर समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण झाली, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेच पाहिजे संजय शिरसाट म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे आरोप केले आहेत, त्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यातून 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' झालेच पाहिजे. मनोज जरांगे-पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोण कारस्थान करत आहे? कोण कोणाला बदनाम करत आहे? आणि कोणी कोणाला सुपारी दिली आहे? हा संपूर्ण प्रकार जनतेसमोर आला पाहिजे. एकनाथ शिंदे-जरांगे-पाटील यांची मागणी एकच संजय शिरसाट म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांनी ज्या चौकशीची मागणी केली आहे, तीच मागणी एकनाथ शिंदे यांनीही केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य काय आहे ते समोर आले पाहिजे. ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे लोक नेमके कोणाचे समर्थक आहेत आणि त्यांनी असे वक्तव्य का केले, हे लोकांसमोर आलेच पाहिजे. ऑडिओ क्लिप खरी आहे की बनावट, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे. हे ही वृत्त वाचा मनोज जरांगेंकडून गुप्त ऑडिओ क्लिप जाहीर:"जरांगेंना डॅमेज करण्यासाठी मराठ्यांनाच रसद पुरवा, 500 कोटी दिल्याची चर्चा"; शिंदे-फडणवीसांना इशारा
"मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला' म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही," असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. वाचा सविस्तर
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

बारामतीत सतेज पाटलांचे ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनर! महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण
अंधेरी स्टेशनवर अवतरले ‘यमराज’; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनोखी जनजागृती!
लँडिंगच्या काही मिनिटे आधी विमानावर वीज कोसळली; प्रवाशांमध्ये भीती!
देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!



























Subscribe to my channel




