नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास

नाशिक: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे घेण्यात आलेल्या सीए इंटरमीडिएट (CA Intermediate) सप्टेंबर २०२६ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, नाशिकची गुणवंत विद्यार्थिनी साक्षी चांडक (Sakshi Chandak) हिने ५०२ गुण (८३.६७ टक्के) मिळवून संपूर्ण देशात प्रथम क्रमांक (All India Rank 1) पटकावला आहे. साक्षीने मुंबईच्या नील राजेश शाह याच्यासोबत संयुक्तपणे देशात अव्वल स्थान पटकावून नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यापूर्वी तिने सीए फाउंडेशन परीक्षेतही देशात चौथा क्रमांक पटकावला होता.

यशाचा प्रवास आणि दिनचर्या:

मूळची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीची रहिवासी असलेली साक्षी सध्या पुणे विद्यापीठातून बी.कॉम.चे शिक्षण घेत असून, तिने जुलै २०२५ पासून सीए इंटरमीडिएट परीक्षेची तयारी सुरू केली होती. साक्षीची शैक्षणिक पार्श्वभूमी सुरुवातीपासूनच अत्यंत उज्ज्वल राहिली आहे. तिने सीबीएसई १० वीच्या परीक्षेत ९७.४ टक्के गुण मिळवून तालुक्यात दुसरा आणि शाळेत पहिला क्रमांक मिळवला होता, तर महाराष्ट्र बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेत ९४.३३ टक्के गुण मिळवून ती नाशिक जिल्ह्यात चौथी आली होती.

आपल्या अभ्यासाच्या रणनीतीबद्दल सांगताना साक्षीने सांगितले की, ती सकाळी लवकर अभ्यासाला सुरुवात करत असे. रोज सकाळी ५ वाजता उठून रात्री १०:३० वाजेपर्यंत रणनीतिक ब्रेक्स घेऊन ती दररोज सुमारे १२ तास अभ्यास करायची. परीक्षेचे दिवस जवळ येताच तिने हा वेळ १४ तासांपर्यंत वाढवला होता.

अभ्यासाचे नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर:

साक्षीने प्रत्येक विषयाचे अत्यंत काटेकोर नियोजन केले होते. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट (SM) हा विषय कठीण वाटत असल्याने तिने त्याची बारंवार उजळणी केली. ऑडिट (Auditing) विषयाचे चार टप्प्यांत रिव्हिजन केले, तर टॅक्स (Taxation) विषयासाठी सुरुवातीपासूनच भरपूर सराव केला. संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आणि केस लॉज (Case Laws) समजण्यासाठी तिने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली.

तणावाच्या क्षणांविषयी बोलताना ती म्हणाली की, परीक्षेपूर्वी अभ्यासाच्या सुट्ट्यांचा काळ अत्यंत मानसिक तणावाचा होता, परंतु स्वतःच्या कष्टांवर असलेला विश्वास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांच्या पाठींब्यामुळे तिने मानसिक कणखरता कायम ठेवली. या ऐतिहासिक यशाचे श्रेय तिने आपल्या पालकांच्या पाठिंब्याला आणि कठोर परिश्रमाला दिले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

2 thoughts on “नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास”

  1. साक्षी चांडक यांचे हे यश खरोखर अभिमानास्पद आहे. ५०२ गुण आणि देशात प्रथम क्रमांक — हे केवळ बुद्धिमत्तेचे फळ नाही, तर रोज सकाळी ५ वाजता उठून १२ ते १४ तास शिस्तीने अभ्यास करण्याचे फळ आहे. विशेष म्हणजे तिने AI चा वापर केस लॉज समजून घेण्यासाठी केला, सोपा मार्ग म्हणून नाही — हा तरुणाईसाठी महत्त्वाचा धडा आहे. इगतपुरीसारख्या छोट्या तालुक्यातून पुण्यात शिक्षणासाठी जाऊन स्वतःचे राहणे, वेळ आणि अभ्यास यांचे नियोजन करणे सोपे नसते. परीक्षा किंवा कोचिंगसाठी दुसऱ्या शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आधीच निश्चित करावी लागते — जसे sarangpur trust dharamshala online room booking आधीच करून ठेवणे, म्हणजे शेवटच्या क्षणी अनावश्यक ताण नको. साक्षीला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *