ऑडिओ क्लिपमागील ‘ती’ अदृश्य शक्ती कोणती?:जरांगे-पाटील अन् शिंदेंची मागणी एकच; क्लिपची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- संजय शिरसाट

मनोज जरांगे-पाटील यांनी काल 500 कोटी रुपयांचा कोणताही थेट आरोप केलेला नव्हता. एकनाथ शिंदे यांनी पैसे घेतले नाहीत आणि दिलेही नाहीत, हे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे तो विषय तिथेच संपला आहे. मात्र, मनोज जरांगे-पाटील यांनी जी ऑडिओ क्लिप ऐकवली, त्यात चार लोक विविध विषयांवर चर्चा करताना ऐकू येत आहेत. ती क्लिप खरी आहे का? त्यात बोलणारे व्यक्ती कोण आहेत? त्यांना ही सुपारी कोणी दिली? आणि यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे? हे सर्व सत्य बाहेर येण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, मी जरांगे-पाटील यांना विनंती करतो की, जर त्यांच्याकडे बदनामी करणाऱ्यांची नावे असतील तर ती त्यांनी जाहीर केली पाहिजेत. त्यामुळे अशी बदनामी करणाऱ्यांच्या मनात आपण उघडे पडू, अशी भीती निर्माण होईल. रोज एकमेकांचे डोके फोडणे आणि परस्परांविरोधात बोलणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. राजकारण एका बाजूला ठेवा, पण जर समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण झाली, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेच पाहिजे संजय शिरसाट म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे आरोप केले आहेत, त्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यातून 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' झालेच पाहिजे. मनोज जरांगे-पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोण कारस्थान करत आहे? कोण कोणाला बदनाम करत आहे? आणि कोणी कोणाला सुपारी दिली आहे? हा संपूर्ण प्रकार जनतेसमोर आला पाहिजे. एकनाथ शिंदे-जरांगे-पाटील यांची मागणी एकच संजय शिरसाट म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांनी ज्या चौकशीची मागणी केली आहे, तीच मागणी एकनाथ शिंदे यांनीही केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य काय आहे ते समोर आले पाहिजे. ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे लोक नेमके कोणाचे समर्थक आहेत आणि त्यांनी असे वक्तव्य का केले, हे लोकांसमोर आलेच पाहिजे. ऑडिओ क्लिप खरी आहे की बनावट, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे. हे ही वृत्त वाचा मनोज जरांगेंकडून गुप्त ऑडिओ क्लिप जाहीर:"जरांगेंना डॅमेज करण्यासाठी मराठ्यांनाच रसद पुरवा, 500 कोटी दिल्याची चर्चा"; शिंदे-फडणवीसांना इशारा "मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला' म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही," असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. वाचा सविस्तर

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *