
Maharashtra : सातारा-कोयनेच्या शिवसागर जलाशयात सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने नवीन शिवप्रताप तराफा दाखल झाला आहे. या तराफ्यामुळे कोयनेतील बामणोली, तापोळा, दुर्गम कांदाटी खोऱ्यातील दळणवळण सोयीचे होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांच्या हस्ते या तराफ्याची चाचणी घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रकाश शिंदे, गटविकास अधिकारी अरूण मरभळ, तापोळ्याचे सरपंच रमेश धनावडे, योगेश गारडे, जिल्हा परिषद महाबळेश्वर व्यवस्थापक संपत नलावडे, संतोष पवार, मंगेश माने, सुभाष कदम, सिताराम धनावडे, राहुल भोसले, गणेश भोपळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाग असलेला हा सर्व परिसर कोयनेच्या शिवसागर जलाशयामुळे दुर्गम असला, तरी निसर्गसंपन्न आहे. या भागातील बामणोली व तापोळा ही दोन महत्त्वाची बाजारपेठेची गावे आहेत. कोयनेच्या अलीकडील भागात जावली तालुक्यातील बामणोलीसह २२ गावे येतात तर कोयना,सोळशी नदीच्या संगमावर तापोळा वसलेले आहे. तापोळा हे विभागातील बाजारपेठेचे मुख्य गाव आहे. या ठिकाणी जलपर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. पश्चिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावासह दुर्गम व दूर असलेल्या कांदाटी खोऱ्यातील जनतेला तापोळ्याशी जोडणारी एकमेव सेवा तराफ्याची आहे.
|
|
अवजड मालाची वाहने, चारचाकी वाहने नदीच्या अलीकडे-पलीकडे करण्यासाठी तराफा सेवा महत्त्वाची आहे. तापोळा, कोळघर सोळशी व गाढवली या ठिकाणी तराफ्यातून वाहतूक करता येते.
दोन तराफ्यांची सोय.. सध्या बामणोली (पावशेवाडी) या ठिकाणी नवीन जेट्टी बांधण्यात आली असून पलीकडे दरे गावी जेट्टीचे काम झालेले नाही. दरे गावी जेट्टीचे काम झाल्यावर बामणोलीतून कांदाटी खोऱ्यात जाणे सोयीचे होणार आहे. हा नवीन तराफा जुन्या ठिकाणीच चालणार आहे. पूर्वीचा एक तराफा व नवीन एक अशा दोन तराफ्यांमुळे दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे.
शहर
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- "ओला, उबर आणि रॅपिडोच्या मनमानीला लगाम: महाराष्ट्र सरकारचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; आता नियमांचे पालन अनिवार्य"
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
गुन्हा
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
- इस्रोचे महत्त्वाचे धोरण बदल: 'गगनयान'सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यावर निर्बंध; नोकरशाहीचा निर्णय
- पंख उधार घेऊन भरारी घेता येत नाही; आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी स्वदेशी पंखांची गरज!
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.



























Subscribe to my channel



