Sanjay Raut and Dada Bhuse | संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला; मैत्रीचे नाते कायम

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर 178 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. आज या खटल्याच्या सुनावणीसाठी दोन्ही नेते मालेगाव कोर्टात हजर होते. या वेळी संजय राऊत यांनी खटला मागे घेतल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. संजय राऊत यांनीही या वेळेस सांगितले की, “आमच्यात मैत्रीचे संबंध कायम राहतील. जे विधान मी केले ते चुकीचे होते. पडताळणी केल्यानंतर मला खरी माहिती मिळाली. त्यामुळे खटला मागे घेतला.” संजय राऊत यांनी म्हटले की, या प्रकरणाशी आमचा थेट संबंध नव्हता, फक्त अद्वैत हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही त्यात गुंतलो. अद्वैत हिरे सत्तेत आहेत, त्यांना हा खटला लढायचा असेल तर ते लढू शकतात, असा टोला राऊतांनी लगावला. दोन्ही नेत्यांनी मीडिया समोर येऊन सांगितले की, खटला संपवला आहे आणि मालेगावच्या शेतकऱ्यांचा व नागरिकांचा भ्रम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *