श्री गणेशाचे पूजन करत असताना दुर्वा समर्पित करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. 21 दुर्वांची जुडी श्री गणेशाला अर्पण केल्याशिवाय त्याची पूजा संपूर्णत्वाला प्राप्त होत नाही. तर या दुर्वा समर्पित का केल्या जातात?श्री गणेशाला दूर्वा का आवडतात? याबद्दलही काही महत्त्वाचे पौराणिक उल्लेख आढळतात. सर्वप्रथम दुर्वा म्हणजे काय? हे जाणणे ही आवश्यक आहे. ‘दुर्वा’या शब्दाचा अर्थ असा होतो की, “दु:खं व्रजति इति दुर्वा” – जे दुःख दूर करते ती दुर्वा. म्हणजेच ती तृण असूनही अनंत शक्तीची वाहक आहे. ती ज्या प्रकारे कितीही काढली तरी पुन्हा पुन्हा उगम पावते, तिच्या मुळ्या कधीही नष्ट होत नाहीत. सतत पुनरजीवीत होत राहतात.म्हणून ती अनंतचेतनेचं प्रतीक आहे. या दुर्वा पुनर्जन्म, पुनरुत्थान, व अजेयता दर्शवतात. श्री गणेशाला दुर्वा समर्पित करण्यामागे अनलासुराचा वध ही पौराणिक कथा आहे. ती या प्रमाणे: गणेश पुराणातील कथेनुसार, प्राचीन काळी अनलासुर नावाचा एक अत्यंत भयानक राक्षस होता. 'अनल' म्हणजे अग्नी. हा राक्षस आपल्या तोंडून निघणाऱ्या अग्नीने ऋषीमुनींना आणि देवांना जिवंत गिळून टाकत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून सर्व देवांनी भगवान गणेशाचा धावा केला.भक्तांच्या रक्षणासाठी गणपतीने अनलासुराला जिवंत गिळले. अनलासुर हा अग्नीचा बनलेला असल्याने तो पोटात गेल्यावर गणपतीच्या पोटात प्रचंड आग आणि दाह, जळजळ होऊ लागली. श्री गणेशाचा दाह शांत करण्यासाठी देवांनी अनेक उपाय केले, वरुण देवाने शितल जलाचा वर्षाव केला. महादेवांनी आपल्या गळ्यातील साप गणपतीच्या पोटाला गुंडाळला.इंद्राने चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला. परंतु, या कोणत्याही उपायाने गणपतीची आग शांत झाली नाही. शेवटी, तेथे उपस्थित असलेल्या 88 हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी 21 दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली. काही ठिकाणी श्री कश्यपुरुषांनी श्री गणेशाच्या मस्तकावर 21 दुर्वांची जुडी ठेवल्याचा उल्लेख आहे. दुर्वांचा स्पर्श होताच गणपतीच्या शरीराचा दाह पूर्णपणे शांत झाला. यामुळे प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने घोषित केले की, "जी व्यक्ती मला दुर्वा अर्पण करेल, ती मला अत्यंत प्रिय असेल आणि तिच्यावर माझी सदैव कृपा राहील." तेव्हापासून गणपतीला 21 दुर्वा वाहण्याची परंपरा सुरू झाली. काही ठिकाणी दुर्वांचा रस करून श्री गणेशास प्राशन करण्यास दिला असाही उल्लेख आढळतो. श्री गणेशास दुर्वा अर्पण करण्यामागे अध्यात्मिक कारण ही आहे. आध्यात्मिक व धार्मिक मान्यतेनुसार, सर्व वनस्पतींमध्ये 'गणेशतत्त्व' आकर्षित करण्याची क्षमता दुर्वांमध्ये सर्वात जास्त असते. बाप्पाला दुर्वा वाहिल्याने मूर्तीमधील देवत्व अधिक जागृत होते, ज्याचा भक्तांना आध्यात्मिक लाभ मिळतो. आयुर्वेदानुसार आयुर्वेदात दुर्वाला अतिशय थंड आणि त्रिदोष नाशक (कफ, वात, पित्त शांत करणारी) औषधी वनस्पती मानले जाते. शरीरातील उष्णता किंवा जळजळ कमी करण्यासाठी दुर्वांचा रस अतिशय गुणकारी ठरतो. भाद्रपद महिन्यात (गणेशोत्सवात) निसर्गात उष्णता वाढलेली असते, त्यामुळे वातावरणातील आणि शरीरातील उष्णता संतुलित करण्याचे प्रतीक म्हणून दुर्वांचा वापर केला जातो. दुर्वा वाहताना नेहमी ३ किंवा ५ पात्यांची कोवळी दुर्वा निवडावी.गणपतीला नेहमी २१ किंवा ११ जोड्यांच्या (जुडी) स्वरूपात दुर्वा अर्पण कराव्यात.दुर्वा स्वच्छ धुवून आणि बाप्पाचे चरण, कपाळ किंवा कानाजवळ अर्पण कराव्यात. म्हणून श्री गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी व गणराया सतत प्रसन्न ठेवण्यासाठी त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याला प्रिय असलेल्या दुर्वांची जुडी अर्पण करावी. या दुर्वा अर्पण करताना चा मंत्र खालील प्रमाणे आहे. दुर्वा अर्पण करण्याचा मंत्र
।। 'श्री गणेशाय नम: दुर्वांकुरन समर्पयामि'।।
चतुर्थीच्यावेळी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करताना या मंत्राचा जप करावा. असे केल्याने विघ्नहर्ता प्रसन्न होतो आणि भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




