प्रत्येक गोष्टीत चुका काढणाऱ्या लोकांना जेव्हापंतप्रधान मोदींनी ‘नाराज फूफा’ म्हटले, तेव्हा जणू त्यांनीअशा लोकांची नसच ओळखली. प्रत्येक कुटुंबात असेलोक असतातच. ते प्रत्येक गोष्टीत तक्रार शोधून काढतात.साहजिकच, मोदींचा हा टोमणा व्हायरल होणारच होता.विरोधी नेत्यांनीही याला स्वतःचा अपमान मानला. त्यांनीयावर टीका करायला अजिबात वेळ लावला नाही, पणशेवटी ते तेच करू लागले, ज्याकडे निर्देश केला गेलाहोता. त्यांनी प्रत्येक गोष्टीची तक्रार करणे सुरू केले. उदाहरणार्थ, पी. चिदंबरम यांनी नाराज होऊन सांगितलेकी, ब्रिक्सची शिखर परिषद हा वेळेचा अपव्यय होता.अर्थतज्ज्ञ सुरजित सिंग भल्ला हेदेखील त्यांच्याशी सहमत दिसले. भारताने ब्रिक्स सोडून पाश्चिमात्य आघाड्यांमध्ये सामील व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला. भारताचा 7.8टक्के विकासदर हा खुश होण्याइतका चांगला नव्हता,असेही म्हटले गेले. हा विचार मांडणाऱ्या एका लेखातम्हटले होते की, 40 टक्के कामगार आजही कमीउत्पादकता असलेल्या कृषी क्षेत्रात अडकले आहेत, पण स्वातंत्र्य काळात 80 टक्क्यांहून अधिक कामगार कृषीक्षेत्रात ‘अडकले’ होते, हे सांगायला लेखक विसरले.वास्तविक, वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे कृषी क्षेत्रातकाम करणाऱ्यांची संख्या सतत कमी होत आहे, पण असेसांगणे म्हणजे पेला अर्धा भरलेला आहे, असेसांगण्यासारखे होईल, तर टीकाकारांना फक्त तेच पेलेदिसतात, जे अर्धे रिकामे असतात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांवरदरवर्षी एक नवीन विशेषण तयार करण्याचा आरोप केला.मग त्यांनी त्या विशेषणांची यादीही वाचून दाखवली-नाराज फूफा, दिमागी नक्षल, अर्बन नक्षल, खान मार्केटगँग, आंदोलनजीवी इत्यादी, पण या सगळ्यात मोठे चित्रकुठेतरी सुटून जाते. भारतात नक्कीच अनेक समस्याआहेत. महापालिकांची व्यवस्था कोलमडली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर भ्रष्टाचार अमर्यादवाढला आहे. प्राथमिक शिक्षणाची अवस्था वाईट आहेआणि बेरोजगारी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. पण आपण अनेक आघाड्यांवर यशही मिळवले आहे.टीकाकार खऱ्या समस्याही मांडतात, तेव्हा त्यांचा पूर्वग्रहत्यांची विश्वासार्हता कमी करतो. ‘जेफरीज’ या जागतिकगुंतवणूक बँकेने 9 सप्टेंबर 2026 रोजी एक अहवाल प्रसिद्धकेला. यात भारत सध्या ज्या नव्या औद्योगिक क्रांतीच्याटप्प्यातून जात आहे, तो 2030 पर्यंत सहा क्षेत्रांमध्ये मोठीताकद बनेल. ही क्षेत्रे आहेत: अंतराळ, सेमीकंडक्टर, डेटासेंटर, इलेक्ट्रॉनिक्स, सौर ऊर्जा आणि एअरोस्पेस. भारतआता केवळ रॉकेट लॉन्च करत नाहीये, तर तो एक मोठाअंतराळ उद्योग उभा करत आहे. पण या अहवालामुळे चुका शोधणाऱ्यांचा दृष्टिकोनबदलेल, याची शक्यता कमीच आहे. अहवालात म्हटलेआहे की, भारत आधीच जगातील बहुतांश देशांपेक्षाजास्त सोलार सेल बनवतो. 2030 पर्यंत संपूर्ण सोलारव्हॅल्यू चेनपैकी 90 टक्के काम भारतात होईल. भारतआधीपासूनच जगात दुचाकींचा सर्वात मोठा उत्पादकआहे. तसेच तो कारचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक,सिमेंटचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि स्टीलचातिसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. यासोबतच भारतबसचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि सॉफ्टवेअरसेवांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. रिअल-टाइमडिजिटल पेमेंटच्या बाबतीत तर तो सर्वात पुढे आहे.चिदंबरम, खरगे आदी नेत्यांनाही हे माहीत नाही असे नाही.पण ते फक्त नकारात्मक चित्र पाहण्यावरच ठाम असल्याचेदिसते. काँग्रेसच्या समजूतदार नेत्यांपैकी एकअसलेल्या शशी थरूर यांनी चिदंबरम यांचे म्हणणे खोडूनकाढले. ब्रिक्सचे यजमानपद भूषवणे ही आपल्यासाठीमोठ्या अभिमानाची गोष्ट होती, असे ते म्हणाले. आपण‘ग्लोबल साऊथ’साठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्धकरून देत आहोत, पण दुर्दैवाने, थरूर अशा पक्षात आहेत,ज्याने त्यांच्या पूर्ण क्षमतेचा कधीही वापर केला नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारतात अनेक समस्या आहेत, पणआपण बरेच यशही मिळवले आहे. अशावेळी टीकाकार भारताच्या त्या खऱ्यासमस्याही मांडतात ज्या सोडवण्याचीगरज आहे, तेव्हा त्यांचा पूर्वग्रह त्यांचीविश्वासार्हता कमकुवत करतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




