प्रा. चेतनसिंह सोळंकी यांचा कॉलम:पर्यावरणाबाबत आपण कुठे चुकत आहोत, हे 4 विचारांतून समजून घ्या‎

‎‎‎‎‎‎‎‎हवामान बदल ही मानवजातीने स्वतःसाठीच निर्माण‎केलेली सर्वात गंभीर समस्या आहे. तापमान वाढत आहे.‎पावसाचे स्वरूप बदलत आहे. तसेच, नैसर्गिक आपत्तींमुळे‎जगभरात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यावर मात‎करण्यासाठी सरकारे धोरणे आखत आहेत. उद्योग नवीन‎तंत्रज्ञान विकसित करत आहेत. सौर ऊर्जेचा वापर वाढत‎आहे आणि झाडेही लावली जात आहेत. असे असूनही‎जागतिक तापमानवाढ सातत्याने सुरूच आहे. आपण कुठे‎चुकत आहोत? आपल्याला केवळ उपायांची नव्हे, तर या‎समस्येच्या सखोल आकलनाचीही गरज आहे. या‎लेखात वेगवेगळ्या काळातील आणि पार्श्वभूमीतील 4‎व्यक्तींनी मांडलेले 4 विचार दिले आहेत. आपण कुठे चुकत‎आहोत व हवामान सुधारण्याची योग्य दिशा कोणती असू‎शकते, हे समजून घेण्यास ते आपल्याला मदत करतील. सौदी अरेबियाचे माजी तेल मंत्री शेख अहमद झाकी‎यमानी म्हणाले होते, “दगडांच्या कमतरतेमुळे अश्मयुग‎संपले नव्हते. त्याचप्रमाणे, जगातले तेल संपण्याच्या खूप‎आधीच तेल युग (पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे युग)‎संपुष्टात येईल.” हवामान बदलाच्या संदर्भात याचा अर्थ‎अत्यंत स्पष्ट आहे. कोळसा, पेट्रोल आणि गॅस संपण्याची‎आपण वाट पाहू शकत नाही. त्यांचा वापर आपण कमी‎करायला हवा आणि शेवटी तो बंदच करायला हवा. कारण,‎हे इंधन जाळल्यामुळे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड‎पृथ्वीला सातत्याने उष्ण करत आहे.‎ तेल युग कधी संपवायला हवे, याबाबत अमेरिकेचे माजी‎राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे एक प्रसिद्ध विधान आहे-‎“हवामान बदलाचे परिणाम अनुभवणारी आपली पहिली‎पिढी आहे. आणि यावर काहीतरी ठोस उपाययोजना करू‎शकणारी आपली शेवटची पिढी आहे.” म्हणजेच, हवामान‎बदल ही आता केवळ येणाऱ्या पिढ्यांची समस्या राहिलेली‎नाही. आपल्याला आता, याच क्षणी आणि प्राधान्याने यावर‎कारवाई करावी लागेल.‎ प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणाले होते, “ज्या‎पातळीवरील जाणिवेने एखादी समस्या निर्माण केली आहे,‎त्याच पातळीवरील जाणिवेने ती समस्या सोडवता येत‎नाही.” अधिक उत्पादन, अधिक उपभोग आणि सातत्यपूर्ण‎आर्थिक वाढ या गोष्टींना आपण प्रगतीचा पाया मानले.‎याचमुळे आज हवामान बदल झाला आहे. त्यांच्या मते,‎आपण केवळ जास्त सौर ऊर्जा, अधिक इलेक्ट्रिक वाहने‎किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे ही समस्या सोडवू शकत‎नाही. आपल्याला वेगळ्या दिशेने विचार करावा लागेल.‎ योग्य दिशा ठरवण्यासाठी महात्मा गांधींचा एक प्रसिद्ध‎विचार बहुधा सर्वात महत्त्वाचा आहे. “पृथ्वीवर प्रत्येक‎माणसाची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेशी संसाधने आहेत,‎परंतु प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी नाहीत.” पृथ्वी‎मर्यादित आहे. तिची जमीन, पाणी, जंगले आणि खनिजे‎मर्यादित आहेत. त्यामुळे आपला उपभोगही मर्यादित‎असायला हवा. आपल्याला गरज आणि हाव यातील‎फरक पुन्हा एकदा समजून घ्यावा लागेल. आपण अन्न,‎कपडे, वाहने, घरे, मोबाइल, प्रवास अशा हजारो वस्तू आणि‎सेवा विकत घेतो. त्यांची मागणी करतो. गाडी असो, कपडे‎असोत किंवा लाइट, पंखा असो, आपल्या प्रत्येक‎उपभोगानेनिसर्गाचे काही ना काही नुकसान होतच असते.‎ या 4 विचारांची सांगड घातली, तर हवामान बदलाचे‎कारण आणि सुधारणेची स्पष्ट दिशा दिसते. जीवाश्म‎इंधनाचा वापर थांबवा.आत्ताच कारवाई करा. आपला‎विचार बदला. उपभोग मर्यादित करा. तसेच, जीवन आणि‎व्यवस्था जिथे शक्य असेल तिथे लहान बनवा.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *