पुणे: पुण्यातील नामांकित संस्थांपैकी एक असलेल्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाकडून एक मोठा नियमांचा व कायद्याचा भंग केल्याचे समोर आले आहे. कोंढवा बुद्रुक येथील सिंहगड सिटी स्कूल (Sinhgad City School) कोणतीही कायदेशीर किंवा शासकीय परवानगी न घेताच अन्यत्र स्थलांतरित केल्याप्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापनावर आणि संस्थापकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पुणे महानगरपालिकेने (PMC) स्पष्ट निर्देश देऊनही महापालिकेच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवत मनमानी कारभार सुरू ठेवल्याने शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या आदेशांना स्पष्ट टाळाटाळ: मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीतर्फे चालविण्यात येणारी सिंहगड सिटी स्कूलची अधिकृत परवानगी नसतानाही अनधिकृतपणे शाळा हलविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेला अधिकृत पत्र पाठवून कडक निर्देश दिले होते. शाळेचे स्थलांतर करू नये तसेच मूळ मंजूर ठिकाणीच शाळा सुरू ठेवावी, शिवाय शाळेत कोणत्याही नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्टपणे बजावण्यात आले होते. परंतु, महापालिकेच्या या आदेशाचे व निर्देशांचे पद्धतशीरपणे उल्लंघन करण्यात आले.
पालकांची दिशाभूल करून नवीन प्रवेश व गुन्हा दाखल: महापालिकेने नवीन प्रवेशास स्पष्ट बंदी घातली असतानाही, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये सदर शाळेच्या माध्यमातून पहिलीच्या वर्गात तब्बल ६२ विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे नव्याने प्रवेश देण्यात आले. विशेष बाब म्हणजे, शाळेचे स्थलांतर करण्यास कोणतीही शासकीय परवानगी नाही आणि महापालिकेने नवीन प्रवेशास मज्जाव केला आहे, ही अत्यंत महत्त्वाची वस्तुस्थिती पालकांपासून जाणीवपूर्वक लपवून ठेवली गेली. पालकांची मोठी दिशाभूल करून अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
या संपूर्ण गंभीर प्रकाराची दखल घेत महापालिकेच्या शिक्षण विभागाने पोलिस प्रशासनाकडे धाव घेतली. त्यानुसार, कोंढवा बुद्रुक पोलिसांनी फसवणूक आणि दिशाभूल केल्याप्रकरणी सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले आणि सुनंदा नवले यांच्याविरोधात फसवणुकीचा (Fraud Case) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्यामार्फत सुरू असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




