पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मुले दूर राहण्याच्या प्रयत्नात असतील,‎तर त्याकडे एक आव्हान म्हणून पाहा

5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नैराश्याने वयाची बंधने, ग्रामीण-शहरी दरी ओलांडली. आता ते‎मुलांच्या मनापर्यंत पोहोचले असून, ग्रामीण भागांतही पसरले.‎ग्रामीण वातावरणात अनेकदा उपचारांसाठी मदत घेणे, आजाराची‎ओळख पटणे कठीण असते, तरीही तिथे नैराश्याचे अस्तित्व‎जाणवते. शहरांत असोत, गावांत, प्रौढ व्यक्ती कदाचित कालांतराने‎नैराश्याचा सामना करण्याचे मार्ग शोधून काढतात , परंतु जेव्हा मुले‎याच्या विळख्यात सापडतात, तेव्हा परिस्थिती चिंताजनक बनते.‎

अनेक घरांत, नैराश्यामुळे मुलांनी पालकांशी संवाद साधणे बंद केले.‎त्याला ‘ घोस्टिंग'' म्हटले जाते. मुले स्वतःच्या विश्वात हरवत‎ आहेत, ज्यामुळे पालक थकलेले हतबल झाले. वस्तुतः, ही समस्या‎पालकांच्या आरोग्यावरही परिणाम करू लागली. जर मुले नैराश्याशी‎झुंजत असतील, सोशल मीडियामुळे भरकटली असतील,‎स्क्रीनसमोर अति वेळ घालवत असतील, दुसरीकडे पालक खच्ची‎झाले असतील तर याचे परिणाम काय होतील? आधुनिक‎जीवनशैलीतील बदलांचा विचार करता, जर मुलांनी पालकांशी‎संवाद तोडला म्हणजेच ‘घोस्टिंग'' सुरू केले, त्यांना आयुष्यातून दूर‎ठेवले, तर पालकांनी याकडे समस्या म्हणून न पाहता, आव्हान‎म्हणून पाहावे, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा.‎‎‎



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *