
Maratha Reservatio Mumbai : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या कोअर कमिटीचा तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बैठक बोलावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी सोमवारी रात्री आठ वाजता ही बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान या बैठकीमध्ये भाजप मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका जाहीर करणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. त्यातच सोमवार (30 ऑक्टोबर) रोजी आरक्षणसाठी नेमण्यात आलेल्या उपसिमिची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिंदे समितीने अहवाल सरकरसमोर सादर केला. दरम्यान आता हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. या शिंदे समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
|
|
भाजपच्या बैठकीकडे लक्ष
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलंय. त्यातच मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या समिचीचं अध्यक्षपद हे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजपच्या या बैठकीत आरक्षणाच्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल.
जरांगे उपोषणावर ठाम
दरम्यान मनोज जरांगे यांनी उपोषणावर ठाम आहेत. दिवसागणिक मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृति ढासळत चाललीये. त्यामुळे जरांगे यांनी प्रकृतिची काळजी घेऊन सरकारला थोडा वेळ द्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केलीये. परंतु तरीही जरांगे पाटील हे त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे आता सरकार यावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
भाजपच्या या बैठकीमध्ये कोण उपस्थित राहणार यांची नावं अजूनही समोर आली नाही. पण या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे या बैठकीला भाजपचे कोणते नेते हजेरी लावणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान





























Subscribe to my channel




