नागपूर: राज्यात या वर्षी पावसाच्या लहरीपणा मुळे आणि काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने कोणतीही दिरंगाई न करता संपूर्ण राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशन व विविध दौऱ्यांच्या निमित्ताने त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या धोरणांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.
राज्यातील ३६ पैकी तब्बल ३१ जिल्ह्यांत या वर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला असून, काही भागांत पावसाने ओढ दिल्याने तर काही भागांत अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाची पिकं अक्षरशः हातची गेली आहेत. १ जून ते ३१ ऑगस्ट या महत्त्वाच्या कालावधीत राज्यात अपुऱ्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासंदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले की, बळीराजा आज निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल झाला आहे, परंतु अशा बिकट परिस्थितीतही सरकारकडून शेतकऱ्यांना हवे तसे ठोस आणि तातडीचे संरक्षण मिळत नाही. कागदावर मोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात मदतीचा एक रुपयाही अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचलेला नाही.
शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत रोहित पवारांनी सरकारसमोर विविध प्रमुख मागण्यांचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, राज्यातील ज्या भागात पिके पूर्णपणे जळाली आहेत किंवा पाण्याखाली गेली आहेत, तिथे तातडीने पंचनामे पूर्ण करूनक्ट शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची थेट मदत देण्यात यावी. याशिवाय, पीकविमा योजनेच्या जाचक अटींमुळे सर्वसामान्य शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहत आहेत, त्यामुळे या सर्व अटी रद्द करून एक रुपयात पीकविमा योजना पुन्हा प्रभावीपणे लागू करावी. तसेच, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जाची सरसकट माफी करावी, जेणेकरून नैराश्यात गेलेल्या अन्नदात्याला पुन्हा उभे राहण्यासाठी बळ मिळेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
सरकार केवळ निवडणुका आणि राजकीय फायद्याच्या गोष्टींमध्ये व्यस्त असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी इशारा दिला की, जर येत्या काही दिवसांत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने मदत जमा केली नाही आणि दुष्काळ सदृश परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ते पॅकेज जाहीर केले नाही, तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल. विरोधी पक्षाच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील शेतकरी प्रश्नावरून वातावरण चांगलेच तापले असून, सरकार यावर काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
- मुंबई: महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! आता शेतीशी संबंधित सर्व व्यवहार एकाच डिजिटल छताखाली होणार, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
महाराष्ट्र
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- कोल्हापूर: महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा; कोल्हापूरच्या नांदणी मठात लवकरच परतणार लाडकी 'माधुरी'!
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- जालना: अमृता फडणवीस यांनी प्रेमाने जेवणाचं आमंत्रण दिलं, तर भाऊबिजेला नक्की घरी जाईन मनोज जरांगे पाटील
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



