दहीहंडीत ४ बेस, ४ टॉपची मर्यादा ओलांडली; पुण्यात ११६ मंडळांवर खटले दाखल, प्लाझ्मा-प्रेशर मिडसह ८ ध्वनियंत्रणा जप्त!

पुणे शहरात दहीहंडी आणि आगामी गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. पोलिसांनी घालून दिलेली 'चार बेस आणि चार टॉप' (4 Base, 4 Top) या ध्वनिक्षेपक मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या दहीहंडी मंडळांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.

शहरातील विविध भागांत ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ११६ मंडळांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी शहरात उच्च आवाजात वापरले जाणारे चार प्लाझ्मा, चार प्रेशर मिडसह एकूण आठ ध्वनियंत्रणा (साऊंड सिस्टीम) जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या स्पष्ट निर्देशानुसार, शहर व उपनगरातील मंडळांची डेसिबल मोजमाप करणाऱ्या यंत्रणेद्वारे कसून तपासणी करण्यात आली. नियमांचा भंग करून आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या किंवा बंदी असलेल्या प्रेशरमिड, प्लाझ्मा साऊंड उपकरणांचा वापर करणाऱ्या मंडळांवर थेट गुन्हे आणि खटले दाखल करण्यात आल्याने आयोजकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे सण-उत्सवांच्या काळात नियमांचे पालन करणे मंडळांसाठी बंधनकारक झाले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *