मुंबई: जोगेश्वरी आणि गोरेगाव या परिसरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) सदनिका वाटपात मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. पात्र आणि हक्कदार लाभार्थ्यांना पूर्णपणे डावलून बोगस किंवा अपात्र व्यक्तींना घरे वाटप करण्यात आल्याच्या तक्रारींची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ सविस्तर अहवाल सादर करण्याचे कठोर निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआरए प्राधिकरणाला दिले आहेत. तसेच, ओशिवरा व्हीलेज येथील प्रकल्पात अपात्र लोकांना घरे वाटप केल्याप्रकरणी संबंधित दोषी एसआरए सक्षम प्राधिकारी आणि सहायक निबंधक या दोन प्रमुख अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित नागरी प्रश्न, विविध पुनर्विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला खासदार रवींद्र वायकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, एसआरएचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बोरीकर, तसेच मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता आणि संबंधित सहायक आयुक्त दूरदृश्यप्रणालीच्या (Video Conferencing) माध्यमातून उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान खासदार रवींद्र वायकर यांनी आपल्या मतदारसंघातील भगतसिंग नगर १, २, ३, दुर्गानगर, कोयना वसाहत, मेघवाडी, सर्वोदय सोसायटी आणि ओशिवरा व्हीलेज या भागातील एसआरए प्रकल्पांबाबत अनेक महत्त्वाच्या तक्रारी मांडल्या. या प्रकल्पांमध्ये कायदेशीररीत्या पात्र असलेल्या खऱ्या लाभार्थ्यांना सदनिका वाटप न करता काही बोगस व्यक्तींना नियम डावलून त्याचे वाटप करण्यात आल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, ज्या-ज्या एसआरए प्रकल्पांमधील घरांच्या वाटपाबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या सर्व प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन एक सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
याचबरोबर, कायमस्वरूपी संक्रमण शिबिर (PTC) इमारती विकासकांकडून (Builders) नियमानुसार एसआरएकडे अद्याप हस्तांतरित न करण्यात आल्याच्या प्रकरणाची देखील कसून चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले आहेत. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये नागरिकांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या किंवा नियमबाह्य कारभार करणाऱ्या कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असा सज्जड दम प्रशासनाला देण्यात आला असून या कठोर कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!
- मुंबई: कृष्णजन्माष्टमीनिमित्त दिविजा फडणवीस यांचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागण्याबद्दल दिला अत्यंत महत्त्वाचा संदेश!
- मुंबई: ठाण्यातील स्टेजवर मोठा प्रसंग एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट, आमदार प्रताप सरनाईकांनी तातडीने आग केली विझवली!
- नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांचे १३ दिवसांचे उपोषण मागे; ३ अधिकारी निलंबित, ५ लाखांची मदत, पण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी लढा सुरूच राहणार!
महाराष्ट्र
- सातारा: मी कायमचा निरोप घेतोय.. साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील लिपिक कामाच्या ताणामुळे रात्रभर बेपत्ता झाल्याने खळबळ, नंतर आला समोर!
- मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!
- मुंबई: कृष्णजन्माष्टमीनिमित्त दिविजा फडणवीस यांचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागण्याबद्दल दिला अत्यंत महत्त्वाचा संदेश!
- मुंबई: ठाण्यातील स्टेजवर मोठा प्रसंग एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट, आमदार प्रताप सरनाईकांनी तातडीने आग केली विझवली!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगढ: संगीत जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी; ३५ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंग याचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ!
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती


























Subscribe to my channel




