सांगली:एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. सांगलीच्या ईश्वरपूर रोडवरील तुंग परिसरात प्रवाशांनी भरलेली एसटी बस चालवत असताना चालकाला अचानक चक्कर आल्यामुळे भीषण अपघात घडला. चालकाचे बसवरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याने ही बस रस्त्यावरील डिव्हायडरवर चढून थेट रस्त्यालगत असलेल्या एका चहाच्या टपरीवर जाऊन जोरदार धडकली. या अपघातात एसटी बसचा पुढील भाग आणि चहाच्या टपरीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील सर्व प्रवासी आणि नागरिक पूर्णपणे सुखरूप आहेत. या घटनेमुळे परिसरात काही वेळ मोठी धावपळ उडाली होती.
नेमक काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, शिराळा आगाराची एसटी बस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन ईश्वरपूर मार्गावरून जात होती. बस तुंग परिसराजवळ पोहोचली असताना, अचानक एसटी चालकाला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याला तीव्र चक्कर आली. चालकाला चक्कर आल्यामुळे बसवरील त्याचे नियंत्रण सुटले. बस वेगात असल्याने ती आधी रस्त्यावरील डिव्हायडरवर चढली आणि त्यानंतर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर जाऊन धडकली. बसमधील प्रवाशांना नेमके काय घडत आहे, हे समजण्याच्या आतच हा अपघात घडल्याने प्रवाशांच्या छातीचा ठोका चुकला होता.
मोठा अनर्थ टळला: ज्या वेळी हा अपघात घडला, त्यावेळी रस्त्यावर आणि चहाच्या टपरीजवळ लोकांची वर्दळ तुलनेने कमी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अपघात झाल्यानंतर तातडीने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आले. तसेच चक्कर आलेल्या एसटी चालकालाही बसमधून बाहेर काढून त्याला त्वरित प्रथमोचारासह वैद्यकीय मदत देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि सुदैवाने मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला आहे.
शहर
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
महाराष्ट्र
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
- जालना: उपोषणाचा चौथा दिवस! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मळमळ अन् उलट्यांचा त्रास; वैद्यकीय तपासणीस स्पष्ट नकार
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण




























Subscribe to my channel



