पुणे: भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रदेश कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी पुण्यात आलेले राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक मोठे आणि चर्चेत राहणारे विधान केले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाबाबत आणि सरकारकडून सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारले असता, मुनगंटीवार यांनी आपण सरकारचा भाग नसून केवळ एक आमदार असल्याचे स्पष्ट केले.
सरकार नेहमीच चर्चेसाठी तयार: यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार मराठा आंदोलनाबाबत आणि इतर प्रश्नांवर नेहमीच संवाद साधण्यास तयार असते. संवादातूनच प्रत्येक समस्येवर तोडगा निघू शकतो आणि समाधानाकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे की आम्ही चर्चेची दारे कधीही बंद केली नाहीत आणि संवाद साधायला आमची तयारी आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कुठे अडतंय मला माहीत नाही: जेव्हा पत्रकारांनी मुनगंटीवार यांना असा सवाल केला की, जर सरकार संवाद करायला तयार आहे आणि मनोज जरांगे यांचीही भूमिका स्पष्ट आहे, तर मग नेमकी अडचण कुठे येत आहे? यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत पण स्पष्ट शब्दांत सांगितले की, "कुठे अडतंय हे मला माहीत नाही. मी सरकारचा भाग नाही. मी केवळ एक आमदार आणि लोकप्रतिनिधी आहे. संवादाच्या टेबलवर मी प्रत्यक्ष बसत नाही." त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत नेमके काय घडत आहे, यावर त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या असून, त्यांच्या या वक्तव्याचे विविध अर्थ काढले जात आहेत.
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




