पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:संतुलित, मधुर व अर्थपूर्ण शब्द‎ बोलणे हीदेखील एक पूजाच‎

विवेकानंद म्हणायचे की तुमचे शब्द तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधित्व‎करतात. आजकाल लोकांनी गोष्टी रचण्याच्या कलेत प्रावीण्य मिळवले‎आहे. बाहेरून गोड शब्द बोलत असले तरी आतून काहीतरी वेगळेच‎घडत असते. पण हे फार काळ टिकत नाही. अध्यात्म सांगते, "तुम्ही‎बोलाल, ते हृदयापासून बोला. तुमचे हृदय शुद्ध असेल तर तुमचे शब्दही‎शुद्ध असतील. शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते. तुम्ही तुमच्या‎अंतरात्म्याचे प्रतिबिंब दाखवणारे शब्द बोललात तर तुमचा‎आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला शांत वाटेल. हळूहळू नव्या पिढीचा‎शब्दसंग्रह गोंधळलेला होत चालला आहे. तो आधीच विकृतीकडे‎वाटचाल करत आहे. सोशल मीडियावर होणारे संदेश केवळ‎डोळ्यांनीच वाचले जात नाहीत तर ते कानांतूनही आत शिरत आहेत.‎त्यात सत्याचा अभाव असल्याने दिशाभूल करण्याचे आकर्षण असते.‎म्हणून किमान आपल्या अंतर्मनातील शब्दांवर काम करा. केवळ‎संतुलित, मधुर आणि अर्थपूर्ण शब्दच बोला. ही सुद्धा एक प्रकारची‎पूजा आणि ध्यान आहे.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *