अमरावती: अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या आश्रमशाळेत शिकणाऱ्या अवघ्या ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात रहस्यमय व संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव प्रिया गणेश मावस्कर (वय ११, रा. राणीगाव, ता. धारणी, जि. अमरावती) असे असून, ती या शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिचा मोठा भाऊ याच शाळेत नववीच्या वर्गात शिकतो. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि तेथील कारभाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास प्रिया हिला अचानक पोटात व पायात तीव्र वेदना जाणवू लागल्या, तसेच तिने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. तिची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर शाळेच्या वतीने तिला तातडीने भातकुली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत तिचा पल्स रेट वाढलेला आढळल्याने वैद्यकीय तपासणी आणि टूडी इको (2D Echo) तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या संपूर्ण प्रकरणात शाळा प्रशासनाने आणि डॉक्टरांनी तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack / Cardiac Arrest) झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, या प्रकरणामध्ये सर्वात संशयास्पद बाब म्हणजे, विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर आदिवासी विकास विभाग व शाळा प्रशासनाकडून तिच्या गरीब पालकांना तात्काळ सानुग्रह अनुदान म्हणून दोन लाखांचा धनादेश (Cheque) देण्यात आला. मृत्यूनंतर इतक्या वेगाने आर्थिक मदत देणे आणि पालकांवर दबाव आणून शवविच्छेदन (Post-mortem) करण्यास प्रवृत्त न करणे यामुळे संपूर्ण घटनेबाबत तीव्र शंका व संशय व्यक्त केला जात आहे. मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण काय, असा सवाल आता पालक व विविध सामाजिक संघटनांकडून उपस्थित केला जात असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!























Subscribe to my channel




