अरबी समुद्राच्या लाटांबरोबर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर वाहून येणारे काळे, चिकट आणि दुर्गंधीयुक्त 'टार बॉल्स' (Tar Balls) केवळ डोळ्यांना खटकणाराकचरा राहिलेला नाही; तर ते सागरी पर्यावरणावर घोंगावणाऱ्या एका अतिशय गंभीर संकटाचे प्रतीक बनले आहेत.
मुंबई, नवी मुंबईसह पालघर, उरण, अलिबाग आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अधून-मधून दिसणारी ही समस्या आता दरवर्षीची झाली असून, पर्यावरणवाद्यांनी याला समुद्राचे 'काळे अश्रू' अशी उपमा दिली आहे.
समुद्रातील वाढत्या प्रदुषणामुळे किनाऱ्यांचे सौंदर्य तर नष्ट होत आहेच, पण मानवी आरोग्य आणि सागरी जीवसृष्टीलाही याचा मोठा फटका बसत आहे. 'टार बॉल्स' म्हणजे नेमकं काय?'टार बॉल्स' म्हणजे समुद्रात जहाजांमधून सांडलेल्या किंवा सोडलेल्या खनिज तेलाचे घट्ट झालेले छोटे-मोठे गोळे.
समुद्रातील तेलगळती, जहाजांमधून केला जाणारा बेकायदेशीर तेल विसर्ग (Oil Dumping), ऑफ-शोअर ड्रिलिंगमधील (समुद्रातील तेल विहिरी) त्रुटी आणि समुद्री अपघातांमुळे मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल पाण्यात मिसळते.
हे तेल समुद्राच्या वाऱ्यामुळे आणि लाटांमुळे एकत्र येऊन त्याचे घट्ट, चिकट गोळे बनतात, ज्यांना 'टार बॉल्स' म्हटले जाते. मान्सूनच्या काळात समुद्राला येणाऱ्या भरतीसोबत हे गोळे प्रचंड प्रमाणावर किनाऱ्यावर वाहून येतात. कोकण ते मुंबई किनारपट्टीला मोठा फटका:या समस्येचा सर्वाधिक फटका मुंबईतील जुहू,
गिरगाव चौपाटी, वर्सोवा तसेच अलिबाग, उरण, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या किनारपट्ट्यांना बसत आहे. सध्या आखाती देशांमधील संघर्ष आणि समुद्री मार्गावरील वाढती जहाजांची वाहतूक यामुळे समुद्रात होणारी तेलगळती आणखी वाढली असून, भविष्यात हा धोका अधिक तीव्र होण्याची भीती वर्तवली जात आहे.
हे टार बॉल्स अत्यंत विषारी असतात. ते किनाऱ्यावरील वाळूत मिसळल्यामुळे पर्यटकांच्या पायाला चिकटतात, ज्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. तसेच मासे आणि इतर समुद्री जीव हे रासायनिक गोळे अन्न समजून गिळतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू होत आहे.
प्रशासकीय उदासीनता आणि 'आवाज' फाउंडेशनचा आक्षेप:पर्यावरण क्षेत्रातील नामांकित संस्था 'आवाज' (Awaaz Foundation) च्या मते, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सध्या सरकारी यंत्रणांची भूमिका केवळ 'किनाऱ्यावर कचरा आला की तो साफ करा' इतकीच मर्यादित आहे.
दरवर्षी हजारो स्वयंसेवक आणि स्वच्छता कर्मचारी किनाऱ्यावरून टनवारी टार बॉल्स गोळा करतात; परंतु ही समस्या मुळापासून रोखण्यासाठी समुद्रात गस्त घालणे किंवा तेल सोडणाऱ्या जहाजांवर कठोर कारवाई करणे, अशी कोणतीही ठोस केंद्रीय यंत्रणा दिसत नाही. जोपर्यंत समुद्रात तेल सोडणाऱ्या जहाजांवर
आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कडक गुन्हे दाखल केले जात नाहीत, तोपर्यंत कोकण आणि मुंबईच्या किनाऱ्यांना या 'काळ्या अश्रूंच्या' संकटातून मुक्त करणे अशक्य आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




