शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' आणि पक्षाचे नाव शिंदेंना देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि अधिकार क्षेत्रावर अत्यंत आक्रमक शब्दांत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कपिल सिब्बल यांचे प्रमुख युक्तिवाद आणि आक्षेप:
-
पक्षघटनेचा विरोधाभास व लाभ: सुनावणीदरम्यान युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिले की, शिंदे गटाने २०१८ मधील शिवसेनेची पक्षघटना लोकशाहीविरोधी असल्याचे कारण देत ती अमान्य केली; मात्र याच पक्षघटनेच्या आधारे संबंधित नेत्यांनी पक्षातून विविध पदे मिळवली, निवडणुका लढवल्या आणि मंत्रीपदेही भूषविली. जर ती घटना लोकशाहीविरोधी होती, तर त्याच आधारे मिळालेले त्यांचे सर्व राजकीय लाभही बेकायदेशीर ठरतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
-
निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रावर प्रश्न: पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की लोकशाहीविरोधी, हे ठरवण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतच येत नाही, असे स्पष्ट करत सिब्बल यांनी आयोगाच्या निर्णयाच्या कायदेशीर वैधतेला आव्हान दिले. निवडणूक आयोगाला केवळ दोन प्रतिस्पर्धी गटांपैकी कोणता गट मूळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतो, एवढेच ठरवायचे असते.
-
फुटीबाबतचा चुकीचा निष्कर्ष: केवळ आमदारांनी वा नेत्यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या म्हणजे राजकीय पक्षात फूट पडली, असा अर्थ काढणे चूकीचे असल्याचे सिब्बल यांनी नमूद केले. विधीमंडळातील फूट ही राजकीय पक्षातील फूट मानू नये, असा युक्तिवाद त्यांनी समाजवादी पक्ष व इतर प्रकरणांचे दाखले देत केला. मूळ राजकीय पक्षात प्रथम फूट पडल्याशिवाय केवळ विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर पक्षाचे नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाला देणे कायदेशीरदृष्ट्या विसंगत असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



