
Solapur : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सोलापूर शहर मध्य विधानसभा जागेवर काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांचा वारसदार ठरविण्यासाठी महाविकास आघाडीत चढाओढ वाढली. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप व शिवसेनेत (शिंदे) दावेदारी कायम आहे. तर सोलापूर दक्षिणमध्ये भाजपने आमदार सुभाष देशमुख यांना तिसऱ्यांदा संधी दिली असताना त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाने अमर रतिकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले वजनदार नेते धर्मराज काडादी हे पेचात सापडले आहेत.
सोलापूर शहर मध्य जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत (शिंदे) ताणाताणी वाढली असताना, दोन्ही पक्षांतर्गतही उमेदवारीसाठी शह-प्रतिशहाचे राजकारण सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे बंधू तथा पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत आणि पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यात स्पर्धा लागली आहे. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. दुसरीकडे ही जागा भाजपकडे गेल्यास त्या विरोधात बंड करण्याची भूमिकाही काळजे यांनी घेतली आहे. मात्र त्याची दखल महायुतीमध्ये कितपत घेतली जाईल, याबाबत प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळते.
|
Mumbai : टीव्ही पाहून पाठवला सलमानच्या धमकीचा संदेश; झारखंडमधून २४ वर्षीय तरूणाला अटक |
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये येऊन धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयोगाच्या हेतूने धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करून कायद्याच्या कसोट्यात अडकलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे देवेंद्र कोठे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असताना त्यांच्या विरोधात पक्षातील अन्य मंडळी एकत्र आली आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये या जागेवर माकपचे नेते, आमदार नरसय्या आडम यांनी येत्या २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी वाद वाढला आहे.
सोलापूर दक्षिणमध्ये वीरशैव लिंगायत समाजातील वजनदार नेते, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी गृहीत धरून गावभेटीवर जोर लावला आहे. परंतु त्याचवेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने या जागेवर हक्क सांगत अमर रतिकांत पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये गोंधळाचे वातावरण दिसून येते. या पार्श्वभूमीवर धर्मराज काडादी यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




