
Sangli : सांगलीमध्ये एका तरुणाच्या घरामध्ये विषारी साप सापडला. दोरी समजून या तरुणाने सापालाच उचलले. सुदैवाने सापाने चावा घेण्यासाठी तोंड पुढे केले पण तरुणाने हात मागे घेतल्यामुळे सुदैवाने तो बचावला. सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथील ही घटना आहे. सुमारे २० वर्षांनी अत्यंत दुर्मिळ फुरसे जातीचा साधारणता २५ सेंमी लांबीचा विषारी साप सापडला. या सापाला सर्पमित्रांनी पकडून त्याच्या अधिवासात सोडला आहे.
कुंडल गावामध्ये राहणाऱ्या प्रशांत गायकवाड याच्या घरामध्ये हा विषारी साप आढळला. बाहेर गेलेला प्रशांत संध्याकाळी घरी आला. घरात आल्यावर तो सोफ्यावर बसला. सोफ्याजवळील एका बॉक्सजवळ त्याला दोरीसारखे काहीतरी पडलेले दिसले. दोरी समजून तो ती उचलायला गेले अन् तेवढ्यात त्या विषारी सापाने प्रशांतच्या हाताच्या दिशेने आपले तोंड उचलले. चपळाईने प्रशांतने आपला हात पाठीमागे घेतल्याने तो बचावला.
|
|
प्रशांतने तात्काळ सर्पमित्र हणमंत माळी यांना फोन करुन बोलावले. त्यांनी या दुर्मिळ सर्पाविषयी माहिती दिली आणि घराशेजारीच डोंगर असल्याने तिथून तो आला असावा असे सांगितले. सर्पमित्राने हा साप पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये त्याला सोडले. महाराष्ट्रात नाग, मण्यार, घोणस, फुरसे या चार विषारी सापांच्या जाती आढळतात.
नाग, मण्यार, घोणस हे विषारी सर्प सर्वत्र आढळत असले तरी फुरसे हा विषारी सर्प कोकण भागात जास्त प्रमाणात सापडत असल्याचे सर्पमित्र नीळकंठ जोंजाळ, तेजस फासे, वर्धन जोंजाळ यांनी सांगितले. या सर्पाचे खादय प्रामुख्याने विंचू, लहान किडे, सरडे, पाली आहेत. कुंडल येथील डोंगराळ परिसरात या सर्पाचे अस्वित्व असल्याचे समोर आले आहे. हे सर्प डोंगराळ भागातील दगडाखाली तसेच प्राण्यांची बिळे, दगडातील भेगा अशा अनेक ठिकाणी लपून बसतात.
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
























Subscribe to my channel




