Rajpal Yadav: अभिनेता राजपाल यादव याने अनेक सिनेमांमध्ये विनोदी भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, शाहिद कपूर यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर करत राजपाल याने बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारली. पण आता अभिनेता भारतातील सर्वांत मोठ्या तुरुंगात आहे. अभिनेता सध्या तिहार तुरुंगात आहे. सांगायचं झालं तर, 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लापता’ सिनेमाच्या वादाबाबत अभिनेत्याला कोर्टाने शिक्षा सुनावली होती. सिनेमाचं दिग्दर्शन राजपाल यादव याने केलं होतं. तर सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि सिनेमाने फक्त 37 लाख रुपयांची कमाई केली.
सिनेमा फ्लॉप झाला. जेवढ्या बजेटमध्ये सिनेमा तयार करण्यात आलेला, तेवढी कमाई देखील सिनेमा करु शकला नाही. अशात उद्योजकाने राजपाल यादव याच्याकडे सतत पैसे मागण्यास सुरुवात केली. अखेर हे प्रकरण सत्र दंडाधिकारी न्यायालयात गेले आणि त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलं.
मिळालेल्या माहितीनुसार, 2010 मध्ये ‘अता पता लापता’ सिनेमासाठी राजपाल याने दिल्ली येथील कंपनी मुरली प्रोडेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5 कोटी रुपये घेतले. या कंपनाचे मालक माधव गोपाळ अग्रवाल आहे. माधव एक उद्योजक आहेत. पैसे मिळत नसल्यामुळे राजपाल यांच्या विरोधाक माधव यांनी तक्रार दाखल केली. तेव्हा माधव यांनी राजपाल याच्याकडून सतत 5 कोटी रुपये मागण्याची सुरुवात केली.
पण एका मुलाखतीत राजपाल याने मोठा खुलासा केला होता, ‘सिनेमा तयार करण्यासाठी मला माधव गोपाल अग्रवार यांनी 5 कोटी रुपये दिले होते. मी ही रक्कम कर्ज म्हणून कधी घेतलीच नव्हती… त्यांनी फायनेंसर म्हणून सिनेमासाठी पैसे लावले होते. कारण त्यांना त्यांच्या नातवाल सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून लॉन्च करण्याचं होतं.’, पण सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर माधव अग्रवाल यांनी राजपाल यांच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं आणि कोर्टाने राजपाल याची दोषी म्हणून घोषणा केली…
2018 मध्ये दिल्लीच्या दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव याला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हे प्रकरण सत्र न्यायालयात पोहोचले. 2019 मध्ये या न्यायालयानेही राजपाल यादवची शिक्षा कायम ठेवली. दरम्यान, राजपाल यादव याच्याकडे असलेल्या पैशांवरील व्याज वाढतच गेले आणि रक्कम 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. अनेक वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर राजपाल यादव याने 5 फेब्रुवारी 2026 मध्ये तिहार तुरुंगात सरेंडर केलं. सध्या राजपाल यादव तुरुंगात असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अभिनेत्याच्या मदतीला धावून आले आहेत.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




