
Raj Thackeray : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठी- हिंदीच्या वादामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उडी मारली होती. या निशिकांत दुबे यांना राज ठाकरे यांनी ऑपन चॅलेंज दिले होते. मीरारोड येथे झालेल्या त्यांना राज ठाकरे यांनी थेट धमकीच दिली. 'दुबे तू आम्हाला पटक पटक के मारणार.. दुबेलाच सांगतो.. दुबे, तू मुंबईत ये...मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे.', अशा शब्दात राज ठाकरे यांनी दुबे यांना प्रत्युत्तर दिले होते. आता मराठी-हिंदी भाषेच्या वादात केंद्रीय मंत्री सतीश चंद्र दुबे यांनी उडी मारली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे यांनाच चॅलेंज केले आहे. '...तर राज ठाकरे यांनी मंचावरून हिंदी भाषिक जनतेची माफी मागावी.', असे विधान त्यांनी केले आहे.
सतीश दुबे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भलीमोठी पोस्ट करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी त्यांना थेट चॅलेंज केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'राज ठाकरे जेव्हा व्यासपीठावर येतात, तेव्हा अचानक त्यांना मराठी धोक्यात वाटू लागते. हिंदी बोलणारा एखादा दुकानदार, रिक्षावाला किंवा प्रवासी दिसला, तर लगेच तो “महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर” हल्ला ठरतो. काय गमतीशीर विडंबना आहे ना… ज्या हिंदीवर त्यांना एवढा आक्षेप आहे, त्याच हिंदीत पत्रकार परिषद घेतल्या जातात, मुलाखती दिल्या जातात आणि Netflix वर एखादी वेब सीरिज बघायची झाली, तर सबटायटल्सही हिंदीतच असतात.'
सतीश दुबे यांनी राज ठाकरे यांची मुलं इंग्रजी शाळेत शितात या मुद्द्यावरून देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी असे लिहिले की, 'आता एक नजर त्यांच्या कुटुंबाकडेही टाकूया. मुलगा इंग्लिश मिडियम शाळेत शिकत होता.पण सार्वजनिक मंचावर आले की लगेच “मराठी अस्मिता” ची चादर ओढली जाते. असे का? कारण खऱ्या प्रश्नांवर बोलणं कठीण असतं. रोजगार, आरोग्य, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षण व्यवस्था. यावर बोलण्यासाठी अभ्यास हवा असतो, जमिनीवर काम पाहिजे, आणि जरा जबाबदारीही. आणि ज्यांना भाषणाच्या नावाखाली फक्त गोंगाट करता येतो, त्यांच्यासाठी “भाषा” हेच सर्वात सोपं लक्ष्य. कारण भाषा बोलत नाही, ती प्रश्न विचारत नाही.'
|
|
सतीश दुबे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पुढे लिहिले की, 'उध्दव ठाकरे यांची राजकारणाची दिशा आता इतकी वाहती झाली आहे की पुढचे वळण कुठे असेल हे सांगणं अवघड झालंय. कधी शिवसेनेचा हिंदुत्वाचा झेंडा, कधी राहुल गांधींसोबत सेक्युलर कवच, कधी बाळासाहेबांच्या नावावर मतं मागणं आणि कधी त्याच बाळासाहेबांच्या विचारांना दुर्लक्षित करणं. राजकारणात मतं बदलणं चूक नाही, पण वारंवार आत्माच बदलणं संशयास्पद नक्कीच ठरतं.'
सतीश दुबे यांनी राज ठाकरेंच्या मराठी अस्मितेवर देखील आक्षेप घेतला आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'आणि हो, जे गुंड पूर्वी रस्त्यावर हिंदी बोर्ड फाडत होते, ते आजही बेरोजगारच आहेत... कारण भाषा नोकरी देत नाही, सन्मानही देत नाही… तो मिळतो कामाने आणि विचारांनी. म्हणून राज ठाकरे साहेब, खरंच जर तुम्ही “महाराष्ट्राच्या अस्मितेचे” खरे रक्षक असाल, तर एक दिवस मंचावरून हिंदी भाषिक जनतेची माफी मागा.'
सतीश दुबे यांनी पुढे सांगितले की, 'ज्यांचा कुठलाही राजकीय अजेंडा नव्हता, फक्त पोटाची भूक आणि रोजगाराची आस होती. आणि उध्दवजी, जर तुम्ही खरोखर बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवत असाल, तर ते “संदर्भानुसार” बदलणं थांबवा. कारण खरा नेता तोच असतो जो भाषांमध्ये भिंती उभ्या करत नाही, पूल बांधतो. मंचावर मराठीत बोलणं चांगली गोष्ट आहे, पण जमिनीवर माणुसकीची भाषा बोलणं त्याहून मोठी आहे.'
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



