पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातून संगीत जगताला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रसिद्ध पंजाबी गायिका यशइंदर कौर (वय २९), ज्या संगीताच्या दुनियेत 'इंदर कौर' म्हणून ओळखल्या जायच्या, त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी लुधियानाजवळील नीलो कालव्यात (Neelo Canal) त्यांचा मृतदेह आढळून आल्याने पंजाबमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा राग मनात धरून कॅनडा राहणाऱ्या एका इसमाने आपल्या साथीदारांच्या मदतीने बंदुकीच्या अणीवर इंदर कौर यांचे अपहरण करून ही हत्या घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
१३ मे पासून होत्या बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, इंदर कौर १३ मे रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आपल्या फोर्ड फिगो कारमधून घरातील काही किराणा आणि जीवनावश्यक सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्या होत्या. मात्र, उशिरापर्यंत त्या घरी परतल्याच नाहीत. कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन लागत नव्हता. सर्वत्र शोध घेऊनही काहीच पत्ता न लागल्याने घाबरलेल्या कुटुंबीयांनी लुधियानाच्या जमालपूर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
तपासादरम्यान पोलिसांना इंदर कौर यांची कार रक्ताच्या डागांनी माखलेल्या अवस्थेत सापडली, ज्यामुळे घातपाताचा संशय बळावला होता. अखेर मंगळवारी सकाळी ११ वाजता नीलो कालव्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. कपडे आणि वर्ण यावरून कुटुंबीयांनी हा मृतदेह इंदर कौर यांचाच असल्याचे स्पष्ट केले.
लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने सूड
मृत इंदर कौर यांच्या भावाने, जोतिंदर सिंह यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत धक्कादायक खुलासे केले आहेत. मोगा जिल्ह्यातील भालूर गावचा रहिवासी असलेला सुखविंदर सिंह उर्फ सुखा हा या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे. सुखविंदर हा सध्या कॅनडामध्ये राहतो, तो आधीच विवाहित असून त्याला मुलेही आहेत. असे असतानाही तो गेल्या काही काळापासून इंदर कौर हिच्यावर लग्न करण्यासाठी प्रचंड दबाव टाकत होता. मात्र, इंदर कौर हिने त्याचा हा प्रस्ताव साफ फेटाळून लावला होता.
कॅनडावरून येऊन रचला खुनाचा कट!
कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, लग्नाचा नकार पचवता न आल्याने सुखविंदर सिंह हा इंदर कौर हिचा बदला घेण्यासाठी विशेषतः कॅनडावरून पंजाबमध्ये आला होता. १३ मे च्या रात्री जेव्हा इंदर कौर बाजारात जात होती,鐘 तेव्हा सुखविंदर आणि त्याचा साथीदार करमजीत सिंह यांनी तिच्या कारवर हल्ला केला. त्यांनी तिला बंदुकीच्या अणीवर जबरदस्तीने गाडीत टाकून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करून तिचा मृतदेह नीलो कालव्यात फेकून दिला.
गुन्हा करून मुख्य आरोपी कॅनडाला पसार
अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, हे भीषण हत्याकांड घडवून आणल्यानंतर मुख्य आरोपी सुखविंदर सिंह पोलिसांना गुंगारा देऊन तात्काळ विमानाने पुन्हा कॅनडाला पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपी देश सोडून पळून गेल्याचा आरोप करत पीडितेच्या कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी समराला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. फरार सह-आरोपी करमजीतचा शोध सुरू असून मुख्य आरोपी सुखविंदरला परदेशातून परत भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू असल्याचे जमालपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




