
Ratnagiri News : शीळ धरणाच्या नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे कोंड गावात सोमवारी (ता. २२) दुपारच्या सुमारास घडली. तनिष्क अक्षय आंबेकर (वय ८) आणि स्मित वासुदेव आंबेकर (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
स्मित हा अंगणवाडीत शिकत होता. तर तनिष्क हा पहिलीत शिकत होता. सोमवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास दोघेही आपआपल्या घरी शाळेत चित्रकलेच्या स्पर्धेसाठी जात असल्याचे सांगत घराबाहेर पडले. मात्र, शाळेत न जाता त्यांनी थेट धरण परिसरातील नदीपात्र गाठले.
नदीपात्राकडे जात असताना गावातील एका व्यक्तीने त्यांना हटकलं. परंतु, दोन्ही चिमुकले ग्रामस्थाची नजर चुकवून पुन्हा धरणाच्या दिशेने गेले. नदीपात्रात असलेलं पाणी पाहून दोन्ही चिमुकल्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. दोघांनीही पाण्यात उड्या घेतल्या.
मात्र, पोहता येत नसल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. यावेळी फणसवळे कोंड गावचे सरपंच निलेश लोंढे आणि दिलीप आंबेकर यांनी चिमुकल्यांना बुडताना पाहिले. दोघांनीही चिमुकल्यांना वाचवण्यासाठी नदीपात्राच्या दिशेने धाव घेतली.
परंतु अंतर जास्त असल्याने धरणाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत दोन्ही मुलं पाण्यात बुडाली होती. लोंढे आणि आंबेकर यांनी चिमुकल्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. दोघांनीही चिमुकल्यांची शोधाशोध केली. अथक प्रयत्नानंतर त्यांनी चिमुकल्यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
शहर
- पुणे: एकट्या रुग्णांसाठी मोठा दिलासा! पुण्याच्या इनामदार हॉस्पिटलतर्फे 'बायस्टँडर' रुग्ण सहाय्यता सेवा सुरू
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
महाराष्ट्र
- सांगली: कुंडलमधील १०० वर्षे जुन्या किर्लोस्कर कंपनी आणि ग्रामस्थांमधील रस्ता विवाद पेटला! माजी आमदार अरुण लाड यांचे ५ तास ठिय्या आंदोलन
- अहिल्यानगर: सहकार वर्तुळातून मोठी बातमी! जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते डॉ. सुजय विखे पाटील यांची बिनविरोध निवड!
- रत्नागिरी: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! कोकणातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना मिळाला आंतरराष्ट्रीय 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार!
- नंदुरबार: खेळता खेळता एरंडीच्या बिया खाल्ल्याने एकाच कुटुंबातील आठ चिमुकल्यांना विषबाधा, एका बालिकेचा मृत्यू
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!
- केरळ: २० वर्षे जुने लाचखोरीचे प्रकरण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात केरळ सरकारचे नवीन दक्षता चौकशीचे आदेश!
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात





























Subscribe to my channel




