
Pune : सांडापणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची ३० गुंठे जागा महापालिकेला ताब्यात मिळावी यासाठी गेल्या पाचसहा वर्षापासून प्रयत्न आहेत. वारंवार पाठपुरावा करून ही जागा ताब्यात देण्याचे आदेश महापालिकेने आणले. त्यानंतरही जागा ताब्यात मिळत नसल्याने महापालकिने हात टेकले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आता थेट कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना पत्र पाठवून या जागेवर काम सुरू करण्यासाठी परवानगी द्या, काम सुरू होत नसल्याने केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने महापालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे असे पत्रात नमूद केले आहे.

मुळामुठा नदी शुद्धीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने जपानमधील जायका कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मार्च २०२२ मध्ये झाले आहे. शहरात ११ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे, त्यांची बहुतांश काम पूर्ण होत आले आहेत. पण औंध येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बॉटेनिकल गार्डनच्या ३० गुंठे जागेतील १० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. ही जागा जैवविविधता उद्यानासाठी आरक्षित असल्याने ती जागा ताब्यात देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने दिल्ली, नागपूर येथील अनेक संस्थांशी पत्रव्यवहार करून त्यांची परवानगी मिळाली. राज्य सरकारने या जागेवरचे आरक्षणही उठवले, त्यानंतर ही जागा ताब्यात मिळेल असे वाटले होते. पण अजूनही जागा ताब्यात आलेली नाही.
महापालिकेने या जागेचा मोबदला म्हणून कृषी विद्यापीठाला रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. पण विद्यापीठाने जागेच्या बदल्यात जागा अशी मागणी केली आहे. महापालिकेकडे ३० गुंठे जागा उपलब्ध नसल्याने त्यास नकार दर्शविला आहे. त्यानंतरही जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र लिहून परवानगी मागितली आहे. या ठिकाणी काम सुरू झाल्यानंतर हे काम पूर्ण होण्यास किमान दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे.
शहर
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: तेरवाडमध्ये भरधाव कंटेनरचा थैमान; पादचारी महिला व दुचाकीस्वारांना चिरडल्याने चारजण जागीच ठार, चालक पसार
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!























Subscribe to my channel



