कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठित आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'गोकुळ' (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ) निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत एकूण २५ जागांपैकी १४ जागांवर विजय मिळवून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'समविचारी आघाडी'ने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. महायुतीतील दिग्गज नेते, मंत्री आणि आमदारांच्या तगड्या आव्हानाला यशस्वीपणे परतवून लावत सतेज पाटील यांनी गोकुळवरील आपली सत्ता कायम राखली आहे.
बहुमत स्पष्ट झाल्यानंतर आता गोकुळच्या पहिल्या अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २५ पैकी १४ जागा जिंकलेल्या समविचारी आघाडीकडून पहिल्या अध्यक्षपदाचा मान गोकुळ दूध संघाचे संस्थापक कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील यांनाच मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार सतेज पाटील पाळणार दिलेला शब्द: निवडणूक प्रचारादरम्यान आणि उमेदवारी निश्चितीच्या वेळीच आमदार सतेज पाटील यांनी शशिकांत पाटील यांच्याबाबत महत्त्वाची घोषणा केली होती. सतेज पाटील यांनी जाहीर व्यासपीठावरून शशिकांत पाटील यांना अध्यक्षपदाचा शब्द दिला होता. त्यामुळे विजयी निकालानंतर सतेज पाटील हे आपल्या शब्दाला जागून शशिकांत पाटील यांच्याच नावावर अध्यक्षपदाचे शिक्कामोर्तब करतील, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
गेल्या वेळी निसटलेली संधी आणि राजकीय हिशेब चुकता: गेल्या वर्षी शशिकांत पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची संधी चालून आली होती. मात्र, विरोधी गटाच्या राजकीय समीकरणांमुळे आणि ऐनवेळी घडलेल्या घडामोडींमुळे ती संधी त्यांच्या हातातून निसटली होती. ज्या विरोधकांनी शशिकांत पाटील यांची अध्यक्षपदाची संधी हिरावून घेतली होती, त्यांच्यावर सतेज पाटील यांनी या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून राजकीय मात केली आहे. त्यामुळे शशिकांत पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लावून जुना हिशेबही पूर्ण केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीचा दारुण पराभव आणि सतेज पाटलांचे वर्चस्व: या निवडणुकीत महायुतीने सत्ता मिळवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार आणि तब्बल १० आमदारांची फौज मैदानात उतरवून सतेज पाटील यांच्याविरोधात घेराबंदी करण्यात आली होती. मात्र, सतेज पाटील यांनी रणनीती आखत या चक्रव्यूहाला भेदले आणि २५ पैकी १४ जागा जिंकून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या घोषणेकडे आता केवळ कोल्हापूरचेच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. आमदार सतेज पाटील लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!


























Subscribe to my channel




