नवी दिल्ली : सोशल मीडिया गाजवल्यानंतर आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेल्या अभिजीत दिपके यांच्या 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) या आंदोलनाची देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. अमेरिकेतून भारतात परतलेले CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर शनिवारी ६ जून २०२६ रोजी भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतचीच वेळ निश्चित केली असून अतिशय कडक नियमावली जारी केली आहे.
काय आहे ५ वाजताची डेडलाईन? अभिजीत दिपके यांच्या या आंदोलनाला सायंकाळी ५ वाजता संपवण्याची डेडलाईन मिळाल्याने सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी ही वेळ स्वतःच्या मनाने दिलेली नाही. यामागे सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) एक ऐतिहासिक निकाल आणि राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे (NGT) कडक कायदेशीर नियम आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा २०१७-२०१८ चा ऐतिहासिक निकाल जंतर-मंतरवरील आंदोलनांसंबंधी ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की, २०१७ मध्ये एनजीटीने (NGT) जंतर-मंतर परिसरातील आंदोलनांवर सरसकट बंदी घातली होती. तिथल्या वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा सरसकट बॅन उठवला, परंतु आंदोलनांसाठी काही कडक नियम आणि वेळेची मर्यादा आखून दिली. त्यानुसार, जंतर-मंतरवर केवळ दिवसाच (सकाळी १० ते सायंकाळी ५) आंदोलन करण्याची परवानगी दिली जाते आणि रात्रीच्या वेळी कोणालाही तिथे थांबता येत नाही.
पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन नीट (NEET-UG) परीक्षेतील कथित अनियमितता, पेपर लीक प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'कॉक्रोच जनता पार्टी'ने या आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक देखील सहभागी झाले आहेत.
दिल्ली पोलिसांचा कडक बंदोबस्त आंदोलनाचे गांभीर्य आणि गर्दी लक्षात घेता दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या जंतर-मंतर तसेच संसद मार्ग पोलीस स्टेशन परिसरात मोठ्या संख्येने तैनात करण्यात आल्या आहेत. जंतर-मंतर मैदानावर ड्रोनद्वारे देखील नजर ठेवली जात आहे. पोलिसांनी आंदोलकांना ५ वाजताची मर्यादा पाळण्याचे कडक आदेश दिले असून, ५ वाजेनंतर आंदोलन सुरू राहिल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा दिला आहे.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




