
Pune : कन्हेरी येथील ऐतिहासिक मारुती राय मंदिरात दर्शन घेतल्यानंतर नारळ फोडून महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी रणनीतीवर स्पष्ट भूमिका मांडली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आगामी काळात विकासकामे आणि संघटनात्मक बांधणी करताना प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविली जाईल. केवळ सतरंज्या उचलायच्या नाहीत, या जुन्या भावनेला पूर्णविराम देण्यात येईल. प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान दिला जाईल. नव्या दमाच्या सक्षम आणि कार्यक्षम युवकांना पुढे आणण्यासाठी ठोस निर्णय घेत त्यांना जबाबदारी आणि संधी उपलब्ध करून दिली जाईल.”
बारामतीची पोटनिवडणूक ही केवळ निवडणूक नसून ऐतिहासिक जबाबदारी असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, “ही जबाबदारी माझ्यावर आणि संपूर्ण बारामतीकरांवर आहे. दोन महिन्यांपूर्वी नियतीने क्रूर खेळ केला. दादा आपल्याला सोडून गेले. त्यांच्या निधनानंतर अलोट जनसागराने श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण देशाला दादा काय चीज होते, हे समजले. विमान अपघातात विखुरलेले कागदपत्रे त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत असलेल्या कार्यमग्नतेची साक्ष देत होते.”
दादांच्या नंतर महिला म्हणून जबाबदारी पार पाडता येईल का, याबाबत अनेकांना संशय होता, असे सांगताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “मात्र दादांच्या आशीर्वादाने ही जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आणि लढण्याचे बळ दिले. मी राज्याला पहिले महिला धोरण देणाऱ्या परिवाराची सून आहे. तरीही कोणीही माझ्या कामाचे मूल्यांकन केवळ महिला म्हणून करू नये, असे मला वाटते.”
दादांच्या निधनानंतर बारामती तालुक्यातील यात्रा, जत्रा आणि उरुस अतिशय साधेपणाने साजरे झाल्याचे सांगताना त्यांनी बारामतीकरांच्या नेत्यांविषयीच्या अपार प्रेम आणि श्रद्धेचे दर्शन घडले असे म्हटले. “बारामतीकरांच्या या विश्वासाला पात्र ठरून दादांच्या स्वप्नातील सुंदर आणि विकसित बारामती घडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी काम करेन,” अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सभेचे वातावरण भावुक झाले होते.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभेला संबोधित करताना म्हटले, “संकट अंगावर घेणारा आणि कामाचा धडाका लावणारा नेता आपल्यात नाही, याची सर्वांना जाणीव आहे. मतदारांचा आवाज मुंबईत नव्हे तर दिल्लीत पोहोचला पाहिजे, असे मतदान करा. कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवावेत. पवार कुटुंबाचे विचार मनात न आणता आपण सर्वजण पवार कुटुंबाचे देणे लागतो, हे मतदानातून सिद्ध करा.”
मंत्री आदिती तटकरे यांनी अजितदादांच्या आठवणींनी भारावून जाऊन भाषण केले. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले. यावेळी आमदार सुनील शेळके, दिलीप वळसे पाटील, सना मलिक, विश्वास देवकाते, भाजपचे अविनाश मोटे आदींनीही आपले विचार मांडले.
उपस्थित मान्यवर: जय पवार, रुतुजा पवार, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, पृथ्वीराज जाचक, वीरधवल जगदाळे, दिगंबर दुर्गाडे, सचिन सातव, किरण गुजर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि बारामतीकर उपस्थित होते.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




