
Pune : शहरात परिणामकारक वाहतूक सुधारणा करण्याच्या उद्देशाने 'कमी खर्चातील वाहतूक व्यवस्थापन' उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अपघाताच्या संख्येत घट झाली असून, वाहतूक कोंडीही निम्म्याने कमी झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने सात ते ३१ जानेवारीदरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना पाळण्याचे आवाहन केले आहे. 'सडक सुरक्षा- जीवन रक्षा' असे यंदाचे घोषवाक्य असून, नागरिकांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस आयुक्त पाटील यांनी शहरातील वाहतूक सुधारणांबाबत माहिती दिली.
शहरातील वाढती वाहनसंख्या, इंधनाचा अपव्यय आणि मानसिक ताण यामुळे वाहतूक कोंडी गंभीर समस्या बनली होती. पुणे शहर २०२३ मध्ये अपघातांमध्ये देशात वरच्या क्रमांकावर होते. ही स्थिती बदलण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून आणि सहआयुक्त डॉ. रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक समस्यांचा प्रायोगिक अभ्यास करण्यात आला. त्याआधारे, शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांवर कमी वेळात व कमी खर्चात परिणामकारक उपाययोजना राबविण्यात आल्या. मुख्य रस्त्यांवरील 'ट्रॅव्हल टाइम' कमी करणे, रस्त्यांची वहन क्षमता वाढविणे, चौकांची पुनर्रचना, सिग्नल सिंक्रोनायझेशन, पार्किंग व्यवस्थापन अशा उपाययोजना करण्यात आल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
|
|
वाहतूक कोंडी ५३ टक्क्यांनी घटली-
मुख्य रस्त्यांवरील वाहतूक वेग सरासरी ३३.८ किलोमीटर प्रतितास इतका वाढला आहे. वाहतूक कोंडीचे प्रमाण ५३ टक्क्यांनी घटले आहे. अपघातांच्या आकडेवारीतही घट नोंदविण्यात आली आहे. २०२३ मध्ये १,२३० अपघात झाले होते, तर २०२४ मध्ये १,४०३ आणि २०२५ मध्ये १,३९७ अपघातांची नोंद झाली आहे. मृत्यूंच्या संख्येतही घट दिसून आल्याचे पाटील यांनी सांगितले.
'पीटीपी' अॅपचा प्रभावी वापर
वाहतूक व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पुणे ट्रॅफिक पोलिस (पीटीपी) मोबाईल अॅप वापरण्यावर भर दिला आहे. तसेच, 'वाहतूक नियमभंग कळवा आणि जिंका' या उपक्रमांतर्गत नागरिकांना बक्षीसे देऊन प्रोत्साहन दिले जात आहे. वाहतूक जनजागृतीसाठी शॉर्ट रील स्पर्धा, रस्ता सुरक्षा शपथ आणि विविध सामाजिक माध्यमांद्वारे प्रचार करण्यात येत आहे.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!




























Subscribe to my channel





1 thought on “Pune : “कमी खर्चात मोठा फरक” – पुण्यात वाहतूक कोंडी निम्म्याने कमी; अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांची माहिती”