
Pune : तब्बल ९ वर्षाने होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीतून १६५ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. पुण्यात एकूण ४१ प्रभाग आहेत ज्यामध्ये प्रत्येक प्रभागाची एक वेगळी ओळख आहे. पुणे शहरातील शनिवार, नारायण आणि सदाशिव (काही भाग) असा कट्टर आणि "ओरिजनल" पुणेकरांचा प्रभाग कुठला असं कोणी विचारलं तर तो म्हणजे प्रभाग क्रमांक २५. प्रभाग क्रमांक २५ म्हणजे पुण्यातील प्रमुख पेठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण, शनिवार आणि सदाशिव सारख्या पेठांचा भाग.
या भागात अगदी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर यासह ऐतिहासिक स्थळांमध्ये केसरी वाडा, शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा यासह पुणे शहराचा वारसा जपणाऱ्या अनेक जागा आहेत. पुणेरी पाट्या, पाट्यांवरुन केलेले विनोद, एक ते चार विश्रांतीची वेळ असल्याने वामकुक्षी घेणाऱ्यांना बोलले जातं तोच हा भाग. बोलण्याची विशिष्ट पद्धत, खाद्यसंस्कृतीवर प्रेम आणि पारंपरिक पेठांमधील खरेदीचे वेड यांसारखी लक्षणे पाहावी लागतील, जे त्यांच्या जीवनशैलीतून दिसतात तेच चोखंदळ पुणेकर इथे गेल्या वर्षानुवर्ष इथे राहतात.आता जेवढी यांचे शिस्त, राहणीमान आहे तेवढाच कटाक्षाने हे मतदान सुद्धा करतात बरं का! त्यामुळे इथल्या मतदारांना कुठलीही प्रलोभने दाखवली तरी त्याचा काही उपयोग नसतो. त्यांना हवा असतो तो शब्द आणि शब्द पूर्ण करणारा नगरसेवकाच्या रूपातील व्यक्ती. पेठेतील वाढती वाहतूक कोंडी, अनाधिकृत बांधकाम, कचऱ्याचे नियोजन, केबल चे जाळे, पार्किंग अशा काही समस्या येथील नागरिकांच्या आहेत. २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत सुद्धा याठिकाणी भाजप चे सर्व ४ नगरसेवक विजयी झाले होते.
|
|
स्वरदा बापट, दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सूनप्रभाग क्रमांक २५ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट या उच्चशिक्षित आहेत. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले असून त्या एलएलएम आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक त्या पहिल्यांदाच लढत असल्या तरी सुद्धा १२ वर्षापूर्वी सांगली महापालिकेची निवडणूक त्यांनी लढविली आहे. एकही गुन्हा दाखल नसलेल्या स्वरदा बापट यांची एकूण ११ कोटी २ लाख रुपयांची मालमत्ता आहे.
भाजपच्या राज्य उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या त्या कन्या आहेत. स्वरदा यांचे वडील श्रीरंग केळकर सांगलीत व्यावसायिक आहेत. गिरीश बापट यांचे निधन झाल्यावर स्वरदा बापट यांनी "पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू" अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. स्वरदा यांनी भारतीय जनता युवा मोर्चाची उपाध्यक्षा म्हणूनही काम पाहिलं आहे.
कुणाल टिळक, दिवंगत आमदार आणि महापौर मुक्ता टिळक यांचे सुपुत्र
कुणाल टिळक हे पुण्याच्या माजी महापौर दिवंगत मुक्ता टिळक यांचे सुपुत्र आहेत. मुक्ता टिळक या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुद्धा होत्या. पुण्यातील एस पी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या कुणाल यांनी पुणे विद्यापीठातून बीबीएची पदवी घेतली आहे. त्याशिवाय त्यांनी एल. एल. एम आंतरराष्ट्रीय संबंध, कायदे आणि सुरक्षा याचे शिक्षण इंग्लंड मधून पूर्ण केलं. आई राजकारणात असल्याने कुणाल यांच्यावर स्वाभाविक लहानपणापासूनच राजकीय संस्कार झाले आहेत.
परंपरागत भाजपचा असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर उमेदवारी कुणाल टिळक यांना मिळेल अशी चर्चा असतानाच भाजप ने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा पराभव झाला. पुढे २०२४ मध्ये हा मतदारसंघ पुन्हा रासने यांनी भाजपकडे आणला. युनिव्हर्सिटी ऑफ स्टरॅथक्लायेद, इंग्लंडचा विद्यार्थी राजदूत म्हणून काम केलेल्या कुणालकडे भाजप युवा मोर्चाचा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती.
राघवेंद्र मानकर
भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पद भूषवलेल्या राघवेंद्र मानकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. सध्या ते भारतीय जनता पक्ष, पुणे शहराचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. भाजपकडे तरुणाईला आकर्षित करून त्यांचे संघटन मजबूत करण्याचं काम करणाऱ्या मानकर प्रभाग २५ मधून निवडणूक लढवणार आहेत. कोविड काळात रेमडेसेव्हिर औषध मिळवण्यासाठी त्यांच्या आंदोलनाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. पुण्यातील पहिल्या २४ तास जनसंपर्क कार्यालय त्यांनी सुरू केलं. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.
स्वप्नाली पंडित
हिंदुदुत्वाचे बाळकडू स्वप्नाली यांना १९९२ मध्येच मिळालं होतं. त्यांचे वडील चंद्रकांत सकपाळ अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने सहभागी झाले होते. स्वप्नाली या वाणिज्य शाखेची (B.COM) पदवीधर आहेत. त्यांचे पती नितीन पंडित हे तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष आहेत. पेठांमध्ये तसेच मध्यवर्ती भागात असलेल्या अनेक बाजार पेठांमध्ये स्वप्नाली पंडित यांची चांगली ओळख तसेच गेली 25 वर्ष सामाजिक काम असल्याने भाजप ने त्यांना उमेदवारी दिली आहे.
कशी आहे पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये लढत?
अ (मागास प्रवर्ग महिला)
स्वप्नाली नितीन पंडित (भाजप)
रूपाली ठोंबरे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
अमृता भोकरे (मनसे)
ब (मागास वर्ग)
राघवेंद्र मानकर (भाजप)
समीर गायकवाड (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)
मंदार कारंडे (अपक्ष)
मनोज पाटील (अपक्ष)
क (सर्वसाधारण महिला)
स्वरदा बापट (भाजप)
ऍड राधिका कुलकर्णी (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
शीतल पायगुडे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
अक्षता निलेश धुमाळ शिंदे (शिवसेना)
ड (सर्वसाधारण)
कुणाल टिळक (भाजप)
संदीप जाधव (राष्ट्रवादी)
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel





1 thought on “Pune Politics : “मूळ पुणेकरांचा” कौल कुणाच्या बाजूने? शनिवार–नारायण पेठांवर भाजप वर्चस्व टिकणार का?”