
Pune : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. ज्यांनी माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय ना, असा युक्तिवादही अजित पवारांनी केला. या विधानाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. अजित पवार यांनी सर्वप्रथम स्वत:च्या पक्षाकडे पाहायला हवं. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील पक्षाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आम्ही कधी आरोप करायला गेलो, तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिला. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना आहे. आजी, माजी सत्ताधारी एकमेकांसमोर भिडले आहेत. एकमेकांवर आरोप सुरु आहेत. परस्परांवरील आरोपांमुळे सगळेच उघडे पडू लागले आहेत, असं चित्र निर्माण झालं आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत सिंचन घोटाळ्याचा विषय काढला. ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा दाखला अजित पवारांनी दिला. ज्यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच सोबत आज मी सत्तेत बसलो ना, असा सवाल अजित पवारांनी केला. हा प्रश्न विचारुन उपमुख्यमंत्र्यांनी थेट भाजपची कोंडी केली.
|
|
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांसाठी सध्या कुठे भ्रष्टाचार करुन पैसा कमावता येईल, हेच लक्ष्य आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कशाप्रकारे कर्जाच्या खाईत लोटली गेली, हे तुम्ही पाहिलं असेल. महापालिकेच्या ८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी सत्ताधाऱ्यांनी मोडल्या. त्या मोडून काय कामं केली, कामं केली असतील तर ती दाखवावीत, असं आव्हान अजित पवारांनी दिलं.
भाजपवर तुटून पडलेल्या अजित पवारांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही आरोप करायला गेलो, तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील. याची काळजी त्यांनी घ्यायला हवी, असं रविंद्र चव्हाण म्हणाले. आरोप-प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे. अजित पवारांनी आधी स्वत:कडे पाहावं आणि ते मोदी, फडणवीसांच्या पक्षाविषयी बोलत आहेत, हे लक्षात ठेवावं, असा सूचक इशारा चव्हाण यांनी दिला.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel




https://shorturl.fm/pAtWD
https://shorturl.fm/W30O4
https://shorturl.fm/YZbuL