मुंबई: विदर्भ आणि मराठवाड्यात मराठा समाज आधीपासूनच अस्तित्वात होता. तो मागास असतानाही १९५६ पासून गठित केलेल्या अन्य कोणत्याही मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाची दखल घेतली नाही; मात्र निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या आयोगाने त्यांची दखल घेतली, असा महत्त्वाचा पुनरुच्चार राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. १९६७ मध्ये ओबीसी समाजाला पहिल्यांदा आरक्षण मिळाले होते. त्यांच्या आरक्षणाला धक्का पोहोचू नये, यासाठीच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस शुक्रे आयोगाने केल्याचा युक्तिवाद राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला.
सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणातील मराठा आरक्षण कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात दाखल विविध याचिकांवर सध्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या विशेष पूर्णपीठासमोर नियमित सुनावणी सुरू आहे. याच सुनावणीदरम्यान राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
शुक्रे आयोगासमोर दोन पर्याय होते
१९६७ मध्ये ओबीसी समाजाला प्रथम आरक्षण मिळाले होते. त्यानुसार, न्या. सुनील शुक्रे आयोगासमोर दोन प्रमुख पर्याय उपलब्ध होते. पहिला पर्याय म्हणजे मराठा समाजाचा थेट ओबीसी आरक्षणात समावेश करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणे.
याबाबत युक्तिवाद करताना महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी न्यायालयाला सांगितले की, "ओबीसी प्रवर्गात मूळ ३११ जातींचा समावेश आहे. जर या प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश केला असता, तर आधीपासूनच असलेल्या ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणावर मोठा परिणाम झाला असता आणि त्यांच्या हक्कावर गदा आली असती. त्यामुळे 'इंदिरा साहनी' न्यायालयाच्या निकालाचा सखोल आधार घेऊन, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र विशेष आरक्षणाची शिफारस करण्याचे धोरण आयोगाने स्वीकारले."
अतिरिक्त आरक्षणाबाबत न्यायालयाचे प्रश्न
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांनी राज्य सरकारला विचारणा केली की, "मराठा समाज हा ओबीसी समाजापेक्षा अधिक मागास आहे, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?" यावर उत्तर देताना महाधिवक्ता साठ्ये यांनी स्पष्ट केले की, "मराठा समाज हा आधीपासूनच मागास राहिलेला आहे, त्यामुळे कोणता समाज अधिक मागास आहे, असे सरसकट तुलना करून सांगता येणार नाही."
यावर पुन्हा न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की, "मग ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात अतिरिक्त १० टक्के आरक्षण वाढवून देऊन मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गातच का करण्यात आला नाही?" यावर उत्तर देताना लोकसंख्या हा एक अत्यंत महत्त्वाचा व कळीचा मुद्दा असल्याचे सांगत, याच जनसंख्येच्या आणि परिस्थितीच्या आधारावर आयोगाने १० टक्के स्वतंत्र विशेष आरक्षण देण्याची शिफारस केल्याचा दावा महाधिवक्त्यांनी न्यायालयासमोर केला.
याचिकाकर्त्यांच्या अनुपस्थितीवरून न्यायालयाची नाराजी
सुनावणीदरम्यान काही याचिकाकर्त्यांनी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती होण्याआधी या विशेषपीठाने तातडीने सविस्तर व नियमित सुनावणी पूर्ण करावी, अशी मागणी केली. मात्र, यावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
न्यायालयाने सुनावले की, "आम्ही गेल्या वर्षभरात तीन खंडपीठ मोडून अत्यंत सातत्याने ही सुनावणी घेत आहोत. प्रत्येक सुनावणीची पुढील तारीख याचिकाकर्त्यांच्या सोयीनुसार आणि सांगण्यावरूनच निश्चित केली जात आहे; परंतु अनेकदा याचिकाकर्त्यांचे मुख्य वकील युक्तिवादासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहत नाहीत." अद्याप अनेक हस्तक्षेपकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण होणे बाकी आहे, तसेच मुख्य याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांचे वकील एकदाही सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित नसल्याची आठवणही यावेळी न्यायालयाने करून दिली.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




