पुणे: शहरात पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. रविवारी कोथरूड आणि पाषाण परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांकडून सुमारे ५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या दोन्ही प्रकरणांत कोथरूड आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना: कोथरूड (पौड रस्ता)
कोथरूडमधील पौड रस्त्यावर रविवारी सकाळी नऊच्या सुमारास पहिली घटना घडली. जनवाडी परिसरात राहणारे एक ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्नीसह दुचाकीवरून भूगावला जात होते. जैन लोहिया आयटी पार्कसमोरील पीएमपी थांब्याजवळ चार चोरट्यांनी त्यांना अडवले. "आम्ही पोलीस आहोत, या भागात ज्येष्ठ नागरिकांना लुटले जात आहे, त्यामुळे दागिने काढून ठेवा," असा बनाव चोरट्यांनी केला.
ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन करून चोरट्यांनी त्यांच्याकडील ४ लाख ८ हजार रुपयांची सोन्याची साखळी कागदात गुंडाळण्याचा बहाणा केला आणि नजर चुकवून ती लंपास केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण अधिक तपास करत आहेत.
दुसरी घटना: पाषाण-सूस रस्ता
दुसरी घटना पाषाण-सूस टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. बाणेर येथील एक ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉकसाठी टेकडीकडे जात असताना दोन चोरट्यांनी त्यांना गाठले. त्यांनीही 'पोलीस' असल्याचे सांगून परिसरात लूटमार सुरू असल्याची भीती घातली. चोरट्यांनी हातचलाखी करून त्यांच्याकडील १ लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि साखळी काढून घेतली व पळ काढला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मांढरे करत आहेत.
पोलीस आवाहन:
पुणे पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यावर कोणीही अनोळखी व्यक्तीने स्वतःला पोलीस असल्याचे सांगून दागिने काढण्यास सांगितल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. असे काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा '११२' या क्रमांकावर संपर्क साधावा.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




