पुणे: पुणे महापालिका (PMC) आणि जलसंपदा विभाग यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला पाणीपट्टी बिलाचा आणि थकबाकीचा वाद आता कमालीचा पेटला आहे. जलसंपदा विभागाकडून होणारी मनमानी बिल आकारणी आणि ससेमिऱ्याला कंटाळून पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार करत तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. २०१६ पासूनचा हा वाद आता तब्बल १,२०० कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला आहे.
औद्योगिक वापर नसतानाही भुर्दंड; पालिकेचे गंभीर आरोप महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात जलसंपदा विभागाच्या चुकीच्या गणना पद्धतीवर आणि कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पुणे शहरात औद्योगिक पाण्याचा वापर नगण्य असतानाही, जलसंपदा विभाग व्यावसायिक आणि औद्योगिक (Industrial) दराने बिलांची अवाजवी आकारणी करत आहे. शहरात व्यावसायिक पाण्याचा वापर प्रत्यक्षापेक्षा कितीतरी पट जास्त गृहीत धरण्यात आला आहे. महापालिका नागरिकांच्या घरगुती वापरासाठी पाणी उचलत असताना त्यांना औद्योगिक दराने बिल लावणे आणि थकबाकीवर १० टक्के दंडाची आकारणी करणे अत्यंत चुकीचे आहे, असे पालिकेने म्हटले आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक भार पडत आहे.
३२ गावांच्या समावेशानंतर पुण्याची गरज २१ टीएमसी पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३२ गावांचा समावेश झाल्यामुळे शहराचा विस्तार आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी, पुण्याची पाण्याची वार्षिक गरज आता २१ टीएमसीपर्यंत (TMC) पोहोचली आहे. सध्या जलसंपदा विभागाने पालिकेसाठी केवळ १४.६ टीएमसीचा जुना कोटा मंजूर केला आहे. यामुळे शहराची कोंडी होत असून, वाढलेली गरज लक्षात घेता पालिकेला अधिकृतपणे २१ टीएमसीचा कोटा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या ५ मुख्य मागण्या: १. चुकीची बिले दुरुस्त करा: जलसंपदा विभागाने पाठवलेली पाण्याची चुकीची व अवाजवी बिले तातडीने दुरुस्त करावीत. २. २१ टीएमसी कोटा मान्य करा: ३२ गावांच्या समावेशानंतर शहराची वाढलेली पाण्याची गरज अधिकृतपणे मान्य करून कोटा वाढवावा. ३. अवाजवी शुल्क रद्द करा: औद्योगिक वापर नसताना लावलेले शुल्क आणि व्यावसायिक वापराची चुकीची गणना यावर वास्तववादी फेरविचार व्हावा. ४. दंडात्मक शुल्कात सवलत: सांडपाणी दंड आणि प्रलंबित बिलांवरील विलंब शुल्कात पालिकेला सवलत मिळावी. ५. परवानग्यांचा खोळंबा थांबवा: खडकवासला जलवाहिनी टाकण्याच्या कामासारख्या प्रकल्पांना शासकीय लालफितशाहीत न अडकवता तातडीने परवानग्या द्याव्यात.
या अत्यंत संवेदनशील आणि पुणेकरांच्या थेट पिण्याच्या पाण्याशी निगडित असलेल्या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि यावर काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




